15 वर्षांनंतर संघाचा बांगलादेश दौरा; एकदिवसीय आणि टी-20 मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर

क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. तब्बल 15 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, ऑस्ट्रेलियाचा पुरुष क्रिकेट संघ पुन्हा एकदा बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौऱ्याची अधिकृत घोषणा केली असून, जून २०२६ मध्ये मर्यादित षटकांची मालिका खेळली जाईल, याला दुजोरा दिला आहे.

या दौऱ्यादरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय (ODI) मालिका खेळली जाईल; त्यानंतर ३ सामन्यांची टी-२० मालिका होईल.

एकदिवसीय मालिकेची सुरुवात ९ जून २०२६ रोजी होणार असून, या मालिकेतील सर्व सामने ढाका येथील ‘शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियम’वर खेळले जातील.

पहिला एकदिवसीय सामना: ९ जून २०२६ – ढाका
दुसरी वनडे: 11 जून 2026 – ढाका
तिसरा एकदिवसीय सामना: १४ जून २०२६ – ढाका

टी-२० मालिका चट्टोग्राम (Chattogram) येथे खेळली जाणार असून, या मालिकेतील सर्व सामने वीर श्रेष्ठ फ्लाईट लेफ्टनंट मतिउर रहमान स्टेडियमवर होतील.

पहिला टी-२० सामना: १७ जून २०२६ – चट्टोग्राम
दुसरा टी-२० सामना: १९ जून २०२६ – चट्टोग्राम
तिसरा टी-२० सामना: २१ जून २०२६ – चट्टोग्राम

या मालिकेसाठी प्रसारणाचे नवीन हक्क (Broadcasting rights) करार निश्चित करण्यात आला आहे. परिणामी, ऑस्ट्रेलियातील प्रेक्षकांना हे सामने ‘Fox Cricket’ आणि ‘Kayo Sports’ या वाहिन्यांवर थेट पाहता येतील. यापूर्वी, या दोन देशांमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकांचे प्रसारण ऑस्ट्रेलियामध्ये केले जात नव्हते.

ऑस्ट्रेलियाने शेवटचा बांगलादेश दौरा (टी-२० मालिकेसाठी) २०२१ मध्ये केला होता, तर बांगलादेशमधील त्यांची शेवटची एकदिवसीय मालिका २०११ मध्ये खेळली गेली होती. त्यावेळी, ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिकेत बांगलादेशचा पराभव केला होता, तर टी-२० मालिकेत बांगलादेशने ४-१ असा विजय मिळवला होता. दरम्यान, या दौऱ्यापूर्वी, ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार असून, तिची सुरुवात ३० मे रोजी होईल.

Comments are closed.