अशोक खरात प्रकरणी साक्षीदार, शिवनिका संस्थेचे उपाध्यक्ष; अपघातात मृत्यू झालेले जितेंद्र शेळके क

अशोक खरात आणि जितेंद्र शेळके समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात (Samruddhi Mahamarg Accident) नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचा (Ashok Kharat) निकटवर्तीय डॉ. जितेंद्र शेळके (Jitendra Shelke) यांचा अंत झाला. या अपघातात त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला असून मुलगा मृत्यूशी झुंज देत आहे.या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, या अपघाताबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संशय व्यक्त केलाय.

डॉ. जितेंद्र गणपतराव शेळके (वय 50) हे शिर्डी परिसरातील एक प्रतिष्ठित नाव होते.ते केवळ उद्योजकच नव्हते, तर ‘सिल्व्हर ओक डेव्हलपर्स’ या नावाने त्यांचा मोठा रिअल इस्टेटचा व्यवसाय होता. व्यवसायासोबतच त्यांची स्वतःची शैक्षणिक संस्था देखील होती, ज्या माध्यमातून त्यांनी शिर्डी आणि परिसरात आपले जाळे विणले होते.

अशोक खरात आणि जितेंद्र शेळके : अशोक खरातशी नाते

भोंदू अशोक खरात याच्याशी शेळके यांचे संबंध जुने होते. 2023 मध्ये अशोक खरातच्या शिवनिका संस्थान ट्रस्टचे ते सदस्य बनले. यानंतर 2025 मध्ये ते शिवनिका संस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष झाले होते. अशोक खरात याच्या शिर्डीतील जमीन व्यवहार गुन्ह्यात शेळके हे महत्त्वाचे साक्षीदार होते. अशोक खरात याच्या अटकेनंतर शिर्डी पोलिसांकडून जितेंद्र शेळके यांची चौकशी झाली होती.

Jitendra Shelke Accident: माहूरगडाहून परतताना काळाचा घाला

सूत्रांच्या माहितीनुसार, या चौकशीनंतर आणि खरातच्या कारनाम्यांची पोलखोल होऊ लागल्यापासून शेळके प्रचंड मानसिक तणावात होते. जितेंद्र शेळके हे आपल्या कुटुंबासह श्री क्षेत्र माहूर येथे दर्शनासाठी गेले होते. तेथून समृद्धी महामार्गाने शिर्डीकडे परतत असताना कोपरगाव-वैजापूर हद्दीत त्यांच्या कारने उभ्या कंटेनरला पाठीमागून भीषण धडक दिली. या धडकेत कारचा चक्काचूर झाला. या अपघातात डॉ. जितेंद्र शेळके (50), पत्नी अनुराधा जितेंद्र शेळके (45) यांचा मृत्यू झालाय. तर मुलगा सुचित जितेंद्र शेळके (14) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Shelke Accident Ashok Kharat Case: अशोक खरातला अटक होताच तणावात गेले, आज कार थेट कंटेनरखाली घुसली; जितेंद्र शेळकेंसह पत्नीचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?, PHOTO

Jitendra Shelke Accident : हा अपघात घडवून आणला नाही ना? खरातच्या निकटवर्तीयाचा मृत्यू; रोहित पवार, सुषमा अंधारेंना संशय, खळबळजनक दावा

आणखी वाचा

Comments are closed.