Video: प्यारे खान आधी स्वतःचं पाहा;पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप, म्हणाल्या..
अमरावती: जिल्ह्यातील परतवाडा येथे अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार करुन त्यांचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी, अधिक तपास सुरू असून भाजप नेत्यांकडून हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचं बोललं जात आहे. त्यावरुन, राजकीय वाद पेटल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणाला धार्मिक रंग दिल्याचा आणि पीडित मुलींची ओळख उघड केल्याचा ठपका ठेवत, त्यांच्यावर 'POCSO' अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे प्रमुख प्यारे खान यांनी केली होती. आता, प्यारे खान यांच्या मागणीनंतर नवनीत राणांनी प्रत्युत्तर दिलं आहे. प्यारे खान कुराण बाजूला ठेऊन संविधान घेणार का? असा सवाल राणा यांनी विचारला.
नाशिकमध्ये आमच्या मुलींना बीफ दिलं, बुरखा घालायला लावला, अमरावतीमध्ये कोल्हे प्रकरण झालं तेव्हा कूठ गेले होते प्यारे खान? राज्यात लव जिहाद होते तेव्हा प्यारे खान कुठं जातात? आमच्या मुलीशी लग्न केलं जाते तेव्हा प्यारे खान खान कुठं जाते? असा सवाल भाजप महिला नेत्या नवनीत राणा यांनी विचारला आहे. तसेच, प्यारे खान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, आम्ही हिंदूंच्या बाजुने असून आजच्या आज तुम्ही पद सोडा, मुस्लिमच्यावतीने माफी मागा, अशी मागणी देखील राणा यांनी केली.
प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, त्यांनी समाजाच्या वतीने माफी मागावी मग नवनीत राणांची कंप्लेंट हवी तिथे करा. हिंदू मुलींना कोणी फसवलं तर नवनीत राणा नेहमीच मैदानात राहील. अचलपूर प्रकरणात लॅपटॉप जप्त होऊ द्या, मग तुमच्याशी बोलू, अचलपूर प्रकरतात पाच ते सहा मुलं होते, ज्यांचे जास्त झाले त्यांचे खुल्या आकाशबाजी करुन केक कापत होते. प्यारे खान एका जबाबदार पदावर आहेत, ते संविधान पुढे ठेवतील की कुराण याच उत्तर द्याव, असा सवालही नवनीत राणा यांनी प्यारे खान यांना विचारला.
परतवाड्याच्या प्रकरणात मुख्य आरोपीच्या वडिलांना सहआरोपी करा, अशी मागणीही भाजप नेत्या नवनीत राणा यांनी केली. मुख्य आरोपीला वडील प्रोत्साहन देतं होते, परिसरातून माहिती घेतली तेव्हा आरोपीचे वडील लोकांना सांगायचे, माझा मुलगा दहा मुली, वीस मुली, तीस मुली या पद्धतीने बोलत असतील तर त्याला तातडीने आरोपी केलं पाहिजे, लॅपटॉप जप्त झाल्यावर सगळी पोल खुलेल, असेही राणांनी म्हटले.
माझी नणंद म्हणत यशोमती ठाकूरांवर हल्लाबोल
भाजप दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी केला होता. त्यावर नवनीत राणा यांनी सडेतोड उत्तर दिलंय. यशोमती ठाकूर यांनी राजकीय पोळ्या शेकणे बंद करावं. नणंद बाईला इतकचं उत्तर आहे, त्यांनाही मुलगी आहे, मलाही मुलगी आहे. नाशिक प्रकरणात बॉस गरीब मुलीचा छळ करत होता, बुरखा घालत होते, त्यांना बिफ खाऊ घालत होते, त्यांना नमाज वाचायला सांगत होते, तेव्हा यशोमती ठाकूर कुठे गेल्या होत्या? असा सवाल नवनीत राणा यांनी केला. नाशिक TCS, खरात प्रकरण किंवा अमरावतीचे परतवाडा प्रकरण असो, गुन्हा करणाऱ्या सगळ्यांना गोळी मारली पाहिजे, पाकिस्तान जेव्हा काही चांगलं करते तेव्हा देशात त्याचे झेंडे लागतात. यशोमती ठाकूर पाकिस्तानची झेंडाप्रेमी आहे की या देशाची? आम्ही धर्मग्रंथ बाजूला ठेवू पण संविधान पुढे ठेवू, पण प्यारे खान यांना विचारा कुराण मागे ठेवा आणि संविधान पुढे ठेवा, असे म्हणत नवनीत राणा यांनी प्यारे खान आणि यशोमती ठाकूर यांच्यावर हल्लाबोल केला.
आणखी वाचा
Comments are closed.