Ratnagiri News – खेडच्या शिरपेचात मानाचा तुरा; कोमल बुटाला दापोली कृषी विद्यापीठाची सुवर्णपदक विजेती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर खेडमधील कन्या कोमल उल्हास बुटाला हिने शैक्षणिक क्षेत्रात सुवर्णमय कामगिरी केली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे संपन्न झालेल्या 44 व्या पदवीदान समारंभात तिने एम.एस्सी. (वनशास्त्र) या विषयात विद्यापीठात प्रथम येण्याचा बहुमान मिळवत सुवर्णपदक पटकावले.

दापोली येथील वनशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या कोमलने आपल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी बजावली. तिच्या या यशाने केवळ बुटाला कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण खेड तालुक्याचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे. कोमल ही खेड येथील नागरिक उल्हास बुटाला यांची कन्या आहे. अत्यंत चिकाटीने तिने वनशास्त्र विषयात आपले संशोधन आणि अभ्यास पूर्ण केला. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल दापोली विद्यापीठाचे कुलगुरू, प्राध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञांकडून तिचे कौतुक होत आहे.

सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव खेड शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या या यशाबद्दल राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी कोमलचे अभिनंदन केले आहे. “मुलीने मिळवलेले हे यश आगामी पिढीतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल,” अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. कोमलच्या या यशामुळे तिच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments are closed.