मुंढवा जमीन घोटाळ्यातील ‘मास्टरमाईंड’ शीतल तेजवानीला जामीन, बावधन पोलिसांचा ‘या’ चुकांमुळे तुरु
पुणे: पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार (Mundhwa land scam) प्रकरणात अटकेत असलेल्या शीतल तेजवानीला जामीन मिळाला आहे. बावधन पोलिसांच्या हलगर्जीपणाचा फायदा तेजवानीला झाला आहे. बावधन पोलिसांनी (Bavdhan police) अटकेपूर्वीच्या पूर्तता पूर्ण करताना कुचराई केली आहे. पोलिसांनी हे जाणीवपूर्वक केल्याची चर्चा रंगलेली आहे. पुणे पोलिसांकडून मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी ताबा घेताना अटकेचे कारण दिले नाही आणि पिंपरीतील सेवा विकास बँकेच्या प्रकरणी दोन तास आधी अटकेबाबत कळवलं नाही. याचं क्षुल्लक कारणांवर उच्च नाययलयाने बावधन पोलिसांच्या कामकाजावर प्रश्न उभे केले. (Mundhwa land scam)
पोलीस असा हजलगर्जीपणा करुच कसं शकतं? हा खरा प्रश्न यानिमित्ताने उभा राहिलेला आहे. सुरुवातीपासूनचं पोलिसांची या प्रकरणातील भूमिकेवर अनेकांनी संशय घेतलेला आहे. अशातच शीतल तेजवानीला जामीन मिळावा म्हणून पोलिसांनी या क्षुल्लक चुका केल्यात का? अशी चर्चा यानिमित्ताने रंगलेली आहे. आता बावधन पोलिसांच्या या दोन गुन्ह्यात शीतल तेजवानीला जामीन मिळणार आहे. अद्याप जामीनाची प्रक्रिया पूर्ण होणं बाकी आहे. दुसरीकडे पुणे पोलिसांच्या प्रकरणात मात्र शीतल अटकेत राहू शकते.(Bavdhan police)
Sheetal Tejwani Pune Land Scam : एका ऑर्डरमध्ये
– याचिका मंजूर करण्यात आली आहे.
– अटक आणि रिमांड बेकायदेशीर ठरवले:
– 16 डिसेंबर 2025 रोजीची अटक बावधन पोलीस स्टेशनमधील CR No. 523/2025 मधील रिमांड आदेश
– त्यानंतरचे सर्व पुढील रिमांड आणि ताब्यात ठेवण्याचे आदेशही बेकायदेशीर ठरवले.
Sheetal Tejwani Pune Land Scam : अर्जदारासाठी काय आदेश दिले?
– अर्जदाराला मुक्त (release) करण्याचे आदेश
– पण त्यासाठी:₹50,000 चा PR bond द्यावा लागेल
– तितक्याच रकमेचे जामीनदार (surety) द्यावे लागतील.
Sheetal Tejwani Pune Land Scam : अटी काय आहेत?
– पुराव्याशी छेडछाड करायची नाही
– साक्षीदारांना धमकी किंवा प्रलोभन द्यायचं नाही
– तपास अधिकाऱ्यासमोर गरजेनुसार हजर राहावं लागेल (चार्जशीटपर्यंत)
– न्यायालयात नियमित हजेरी लावावी लागेल
Sheetal Tejwani Pune Land Scam : दुसऱ्या ऑर्डमध्ये?
– याचिका मंजूर (allowed) करण्यात आली आहे
– 3 जानेवारी 2026 ची अटक आणि रिमांड (CR No. 806/2019, पिंपरी पोलीस स्टेशन) बेकायदेशीर ठरवली आहे
– त्यानंतरचे सर्व रिमांड आणि ताब्याचे आदेशही बेकायदेशीर घोषित केले आहेत
– अर्जदाराला मुक्त (release) करण्याचा आदेश पण: ₹50,000 चा PR bond
– तितक्याच रकमेचे जामीनदार (sureties) द्यावे लागतील
शीतल तेजवानी पुणे जमीन घोटाळा : अति
– पुराव्याशी छेडछाड करायची नाही
– साक्षीदारांना धमकी/प्रलोभन द्यायचं नाही
– तपास अधिकाऱ्यासमोर गरजेनुसार हजर राहणं बंधनकारक
– कोर्टात नियमित हजेरी लावावी लागेल
आणखी वाचा
Comments are closed.