अर्शद वारसी आईच्या मृत्यूसाठी स्वतःलाच मानतो जबाबदार, नेमकं काय कारण ते घ्या जाणुन – Tezzbuzz
अर्शद वारसी हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आता पर्यत अनेक उत्तम चित्रपट केले आणि ते प्रेक्षकांच्या पंसतीस उतरले आहेत. आज अर्शद वारसी याचा 58वा वाढदिवस आहे. हिंदी चित्रपटांमधील अनेक उत्तम चित्रपटांचा अर्शद वारसी भाग राहिले आहेत. तसेच अर्शद वारसी यांनी फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक पुरस्कार जिंकले आहेत.
अर्शद वारसी (varasi)या अभिनेत्याने महेश भट्ट यांच्यासोबत ‘काश’ 1987 चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते आणि ‘रूप की रानी चोरों का राजा’ 1993 मधील एका गाण्याचे नृत्यदिग्दर्शनही केले होते. त्याने 1996 मध्ये ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले. अर्शदचे व्यावसायिक आयुष्य सर्वश्रुत असले तरी, त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे. बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसीने म्हटले आहे की, त्याने आपल्या आई-वडिलांशी कधीही खोटे बोलले नाही.
एका पॉडकास्टमध्ये, अर्शद वारसीने त्याच्या कारकिर्दीबद्दल, पत्नीबद्दल आणि बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळवण्यापूर्वी आलेल्या अडचणींबद्दल चर्चा केली. तो म्हणाला की, त्याला त्याच्या कुटुंबाच्या फारशा आठवणी नाहीत, कारण त्याने आपला बहुतेक बालपण बोर्डिंग स्कूलमध्ये घालवला. तो म्हणाला, अभिनेत्याने पुढे सांगितले की, त्याच्या आईला किडनी फेल्युअरचा त्रास होता आणि तिच्यावर नियमित डायलिसिस सुरू होते. त्या काळात, डॉक्टरांनी कुटुंबाला तिला पाणी न देण्याचा इशारा दिला होता. “ती सतत पाणी मागत होती, पण मला तिला पाणी देण्याची परवानगी नव्हती, आणि एका रात्री तिने पाणी मागितले, पण मी नकार दिला. त्याच रात्री तिचा मृत्यू झाला आणि मी स्वतःला दोष देतो,” असे त्याने आठवले.
बिग बॉस मराठी 6 चे टॉप 5 फायनलिस्ट ठरले, तर आजच होणार ग्रँड फिनाले
Comments are closed.