IPL 2026: अर्धशतक हुकलं, पण इतिहास घडला! वरुण चक्रवर्तीच्या फिरकीत अडकला वैभव सूर्यवंशी

कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर आयपीएल 2026 च्या सामन्यात चाहत्यांना थरारक क्षण पाहायला मिळाले युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक फलंदाजीने रंगात दिसत होता. यंदाच्या हंगामात त्याचा बॅट तुफान फॉर्ममध्ये असून, प्रत्येक सामन्यात तो गोलंदाजांवर तुटून पडताना दिसतोय.

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धही वैभवने जोरदार सुरुवात केली. त्याने 28 चेंडूत 46 धावांची खेळी करत 6 चौकार आणि 2 षटकार ठोकले. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर उभा असतानाच ‘मिस्ट्री स्पिनर’ वरुण चक्रवर्तीने सामन्याचा टर्निंग पॉइंट घडवला.

डावाच्या 9व्या षटकातील चौथ्या चेंडूवर वरुणने फ्लाइट देत चेंडू टाकला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात वैभवचा टाइमिंग चुकला आणि चेंडू हवेत गेला. डीप मिडविकेटवर उभ्या रमनदीप सिंगने शानदार झेल घेत वैभवची खेळी संपवली. तो अवघ्या 4 धावांनी अर्धशतकापासून दूर राहिला.

दरम्यान, या विकेटसह वरुण चक्रवर्तीने मोठा विक्रम गाठला. त्याने टी20 क्रिकेटमध्ये 200 विकेट्स पूर्ण करत खास क्लबमध्ये स्थान मिळवले. हा पराक्रम करणारा 20वा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

वैभव सूर्यवंशीबद्दल बोलायचे झाल्यास, आयपीएल 2026 मध्ये तो ‘रायझिंग स्टार’ ठरतोय. चेन्नईविरुद्ध 17 चेंडूत 52 धावा, बेंगळुरूविरुद्ध 78 (26), मुंबईविरुद्ध 39 (14) अशा तुफानी खेळींमुळे त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याची आक्रमक शैली आणि सातत्य पाहता, तो भविष्यातील मोठा स्टार ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

Comments are closed.