एकनाथ शिंदेंच्या सभेच्या बॅनरवरुन महेश शिंदेंचा फोटो गायब, कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा

सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या साताऱ्यात होणाऱ्या जाहीर सभेपूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे. शहरभर लावण्यात आलेल्या बॅनर्समध्ये शिवसेनेचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांचा फोटो गायब असल्याचं दिसून आलं. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच महेश शिंदे यांचा फोटो गायब असल्याचं सांगितलं जात आहे.

एकनाथ शिंदे यांची ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी आणि शहरात मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यावर अनेक ठिकाणी महेश शिंदे यांचे फोटो नसल्याचे दिसून आले. यामागे पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा राग असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Banner Controversy Satara : कार्यकर्त्यांची नाराजी उघड

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी झालेल्या घडामोडींनंतर महेश शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांना अध्यक्षपदी बसवण्यासाठी शिवसेनेच्या भूमिकेपासून वेगळा निर्णय घेतल्यामुळे कार्यकर्ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, जिल्हा प्रमुख रणजीत भोसले यांनी महेश शिंदे यांचा बॅनरवर फोटो नसणे हे काही कार्यकर्त्यांकडून चुकून झाल्याचे सांगितले आहे.

Political Impact Satara : शिंदेंच्या सभेकडे सर्वांचे लक्ष

आता सोमवारी होणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या सभेला महेश शिंदे उपस्थित राहणार का, ते व्यासपीठावर दिसणार का, याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या घडामोडींमुळे शिंदे गटातील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Political Rift Shivsena : युतीतून निर्माण झाला तणाव

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी युतीला बहुमत असतानाही भाजपने सदस्य फोडून सत्ता मिळवली. या प्रक्रियेत शिवसेनेचे काही सदस्य भाजपच्या बाजूने गेल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.

Satara Zilla Parishad Election : निवडणुकीतील मोठे राजकीय समीकरण

  • शिवसेना-राष्ट्रवादी युतीला 65 पैकी 35 जागा
  • भाजप 27 जागांसह मोठा पक्ष
  • बहुमतासाठी 33 सदस्यांची गरज
  • भाजपने 6 सदस्य फोडत अध्यक्षपद जिंकले
  • शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 3 सदस्य भाजपकडे
  • एका अपक्षाचा पाठिंबा निर्णायक ठरला

Mahesh Shinde Statement : महेश शिंदे यांचे स्पष्टीकरण

महेश शिंदे यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सर्व परिस्थितीची कल्पना दिली होती. मी कोणालाही अंधारात ठेवले नाही, माझी भूमिका स्पष्ट होती, असं ते म्हणाले होते. तसेच कारवाईबाबत निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असं ते म्हणाले होते.

ही बातमी वाचा ;

आणखी वाचा

Comments are closed.