CSK चा ‘हुकूमी एक्का’ बाहेर, आयुष म्हात्रेच्या दुखापतीचा रिपोर्ट आला समोर, ज्याने रातोरात समीकर
Ayush Mhatre Injury Update In Marathi : चेन्नई सुपर किंग्सच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. आधीच एमएस धोनी दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे, तर डेवाल्ड ब्रेविस देखील सुरुवातीच्या सामन्यांत खेळू शकला नव्हता. आता संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे, युवा फलंदाज आयुष म्हात्रे हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.
आयुष म्हात्रेच्या दुखापतीचा रिपोर्ट आला समोर
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या डावातील 5व्या षटकात म्हात्रेची हॅमस्ट्रिंग ताणली गेली. त्यानंतर तो वेदनेने मैदानावरच बसलेला दिसला. फिजिओने त्याची तपासणी केली. त्यानंतर त्याने पुन्हा फलंदाजी सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला, पण काही वेळातच तो बाद झाला. विशेष म्हणजे, तो ज्या चेंडूवर बाद झाला, त्यावेळी तो व्यवस्थित हालचाल करू शकत नव्हता आणि उभ्याउभ्याच शॉट मारण्याचा प्रयत्न करत होता.
आयपीएल 2026 मध्ये आयुष म्हात्रे उत्तम फॉर्ममध्ये होता. पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर त्याने पंजाब किंग्सविरुद्ध 73 धावांची शानदार खेळी केली होती. दिल्लीविरुद्धही त्याने अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला होता. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध त्याने 38 महत्त्वपूर्ण धावा केल्या होत्या. हैदराबादविरुद्धही तो चांगल्या लयीत दिसत होता, पण अचानक झालेल्या दुखापतीने त्याची लय खंडित झाली.
तीन आठवड्यांसाठी बाहेर
आता समोर आलेल्या माहितीनुसार, हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे आयुष म्हात्रेला तब्बल तीन आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे. म्हणजेच तो 10 मेपर्यंत संघाबाहेर राहणार आहे. या कालावधीत चेन्नई सुपर किंग्स किमान पाच सामने खेळणार आहे, आणि त्यात म्हात्रेचा अभाव संघाला महागात पडू शकतो.
संघाचे प्रशिक्षक माइक हसी यांनीही ही बाब मान्य केली. त्यांनी सांगितले, “म्हात्रेची दुखापत ही संघासाठी मोठा धक्का आहे. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता, त्यामुळे त्याची उणीव नक्कीच जाणवेल.” सध्या चेन्नई सुपर किंग्सची स्थिती गुणतालिकेतही फारशी चांगली नाही. 6 पैकी फक्त 2 सामने जिंकून आणि 4 सामने गमावून, 4 गुणांसह आणि -0.780 नेट रनरेटसह संघ सातव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत म्हात्रेचा बाहेर पडणे, चेन्नईच्या अडचणीत आणखी भर घालणारे ठरले आहे.
चेन्नई सुपर किंग्सचे आगामी सामने
23 एप्रिल – विरुद्ध मुंबई इंडियन्स
26 एप्रिल – विरुद्ध गुजरात टायटन्स
2 मे – विरुद्ध मुंबई इंडियन्स
5 मे – विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
१० मे – लखनौ सुपर जायंट्स वि
१५ मे – लखनौ सुपर जायंट्स वि
18 मे – विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
21 मे – विरुद्ध गुजरात टायटन्स
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.