वर्ल्ड चॅम्पियन सूर्यकुमार यादवचा पत्ता कट, श्रेयस अय्यर बनणार टीम इंडियाचा नवा कर्णधार; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय!
२०२८ टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचे नियोजन आतापासूनच समोर येऊ लागले आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने २०२६ चा टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. मात्र, ताज्या वृत्तानुसार निवड समिती आता श्रेयस अय्यरकडे टी-२० संघाची धुरा सोपवण्याचा विचार करत आहे. याचाच अर्थ गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या सूर्यकुमार यादवचे संघातील स्थान धोक्यात असल्याचे दिसत आहे.
च्या‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, सूर्यकुमार यादव नंतर श्रेयस अय्यरला टी-२० संघाचा नवा कर्णधार बनवले जाऊ शकते. श्रेयसकडे इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) कप्तानीचा मोठा अनुभव आहे आणि आयपीएल २०२६ मध्ये तो पंजाब किंग्सचे नेतृत्व करत आहे.
च्या‘टाइम्स ऑफ इंडिया’ने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, अय्यरने आपला शेवटचा टी-२० सामना २०२३ मध्ये खेळला होता आणि सध्या तो या फॉरमॅटमध्ये संघाचा भाग नाही. अशा परिस्थितीत त्याला अचानक परत बोलावून कप्तानी सोपवणे हा एक मोठा निर्णय असेल. सध्या सर्व लक्ष २०२७ च्या वन-डे वर्ल्ड कपवर केंद्रित असल्याने, निवडकर्त्यांना टी-२० च्या नेतृत्वाबाबत विचार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे.
च्याश्रेयस अय्यरला कप्तानीचा दांडगा अनुभव आहे. २०१८ मध्ये त्याला दिल्ली डेअरडेविल्सचे कर्णधारपद मिळाले होते. त्याच्याच नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ आयपीएल २०२० च्या फायनलपर्यंत पोहोचला होता. २०२२ मध्ये तो कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामील झाला आणि त्यानंतर दोनच वर्षांनी म्हणजेच २०२४ मध्ये अय्यरच्या नेतृत्वाखाली KKR ने आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले.
च्यात्याने पंजाब किंग्सचे नशीबही बदलून टाकले आहे. २०१४ नंतर जो पंजाबचा संघ कधीही फायनलपर्यंत मजल मारू शकला नव्हता, त्याच संघाला श्रेयसने आपल्या उत्कृष्ट नेतृत्वाच्या जोरावर ११ वर्षांनंतर फायनलमध्ये पोहोचवले. आता आयपीएल २०२६ मध्येही कर्णधार म्हणून अय्यरची कामगिरी शानदार राहिली आहे. सध्याच्या सीझनमध्ये पंजाब हा एकमेव संघ आहे जो अजूनही अजिंक्य (Unbeaten) असून पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर विराजमान आहे.
Comments are closed.