Ratnagiri News – बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी रद्द करा, अन्यथा उधळवून लावू; शिवसेनेचा इशारा
राजापूर तालुक्यात कुंभवडे-नाणार आणि सागवे परिसरात होणाऱ्या बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाला शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडाडून विरोध केला आहे. सोमवारी (दि.२० एप्रिल रोजी) होणारी बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केली आहे. जर ही जनसुनावणी घेतली तर ती उधळवून लावू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
कुंभवडे-नाणार आणि सागवे परिसरात १४४.९५ हेक्टर क्षेत्रवार ०.९ दशलक्ष टन क्षमतेचा बॉक्साईट उत्खनन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. बॉक्साईट उत्खननामुळे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बाधित होणार आहेत. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाई निर्माण होणार आहे. पाण्याचे स्त्रोत बाधित झाल्यास त्याचा बागायती आणि शेतीवर विपरीत परिणाम होणार आहे. उत्खननामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार होण्याची भीती आहे. उत्खननामुळे माती आणि जैवविविधतेचे नुकसान होणार आहे. उत्खननामुळे पावसाळ्यात भुस्खलन होण्याची भीती आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा या बॉक्साईट प्रकल्पाला विरोध आहे. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ग्रामस्थांच्या पाठीशी आहे.
विनायक राऊत यांचा इशारा
बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे. सोमवारी जर बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी घेतली तर त्या जनसुनावणीत शिवसेनेचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस आणि राजापूर तालुकाप्रमुख कमलाकर कदम प्रकल्पाला कडाडून विरोध करतील, असा इशारा शिवसेना नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.
Comments are closed.