केकेआरचा पहिलाच अन् घातक वार! राजस्थान गुडघ्यावर, पण मुंबई हादरलं, पॉइंट्स टेबलमध्ये ट्विस्ट
आयपीएल 2026 पॉइंट टेबल अपडेट : आयपीएल 2026 च्या हंगामात सलग पराभवाचा धक्का सहन करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) अखेर आपल्या विजयाचे खाते उघडले आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध (RR) झालेल्या अटीतटीच्या सामन्यात रिंकू सिंग आणि अनुकूल रॉय या जोडीने अशक्य वाटणारा विजय खेचून आणला. या विजयामुळे गुणतालिकेत (Points Table) मोठी उलथापालथ झाली असून, मुंबई इंडियन्सची आता शेवटच्या स्थानी घसरण झाली आहे.
𝗖𝗟𝗨𝗧𝗖𝗛. 𝗖𝗢𝗠𝗣𝗢𝗦𝗘𝗗. 𝗖𝗟𝗜𝗡𝗜𝗖𝗔𝗟. 🧊
रिंकू सिंग 🤝 अनुकुल रॉय
स्कोअरकार्ड ▶️ https://t.co/776nTdODZL#TATAIPL | #खेलबिंदास | #KKRvRR | @KKRiders pic.twitter.com/dBQOGLDj1w
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 19 एप्रिल 2026
केकेआरची झेप, मुंबई शेवटच्या स्थानी (IPL Points Table 2026)
या विजयानंतर गुणतालिकेत महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळत आहेत. 7 सामन्यांनंतर केकेआरने 1 विजय आणि 1 अनिर्णित सामन्यासह 3 गुण मिळवले आहेत. यामुळे केकेआरने 10 व्या स्थानावरून 9 व्या स्थानावर झेप घेतली आहे. दुसरीकडे, 5 सामन्यांत केवळ 1 विजय मिळवणारा मुंबई इंडियन्सचा संघ आता 2 गुणांसह थेट तळाला म्हणजेच 10 व्या स्थानी फेकला गेला आहे.
राजस्थानची संधी हुकली
राजस्थान रॉयल्सचा हा या हंगामातील दुसरा पराभव ठरला आहे. हा सामना जिंकला असता तर राजस्थानला पहिल्या क्रमांकावर पोहोचण्याची संधी होती, मात्र या पराभवानंतरही ते 8 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर कायम आहेत. पंजाब किंग्स (PBKS) सध्या 9 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान आहे.
रिंकू-अनुकूलची ‘मॅजिक’ जोडी
राजस्थानने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 9 विकेट्स गमावून 155 धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि 85 धावांवरच 6 विकेट्स पडल्या. सामना पूर्णपणे राजस्थानच्या बाजूने झुकला होता.
मात्र, यानंतर रिंकू सिंह आणि अनुकूल रॉय यांनी अप्रतिम लढत देत सामना फिरवला. दोघांनी सातव्या विकेटसाठी केवळ 37 चेंडूत नाबाद 76 धावांची भागीदारी करत केकेआरला 19.4 षटकांत 6 विकेट्सवर 161 धावांपर्यंत पोहोचवले आणि संघाला अविश्वसनीय विजय मिळवून दिला.
रिंकू सिंहने 34 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 53 धावा करत मॅच-विनिंग खेळी साकारली, तर अनुकूल रॉयने 16 चेंडूत 29 धावांची झटपट खेळी केली. या जोडीने 4 गडी राखून राजस्थानचा पराभव केला आणि केकेआरच्या चाहत्यांना या हंगामातील पहिला जल्लोष करण्याची संधी दिली.
राजस्थानकडून रवींद्र जडेजा याने 2 विकेट्स घेतल्या, तर जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, रवि बिश्नोई आणि यश राज पूंजा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.