असं झालं तर…जन्म प्रमाणपत्र हरवले तर…

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जन्म प्रमाणपत्र हरवल्यास स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका कार्यालयात (जिथे जन्म झाला) जाऊन डुप्लिकेट दाखल्यासाठी अर्ज करता येतो.

‘आपले सरकार’ पोर्टल किंवा सीआरएस अॅपद्वारे ऑनलाइनही अर्ज करू शकता. अर्ज करताना जन्मतारीख, ठिकाण आणि हॉस्पिटलची माहिती अचूक देणे गरजेचे आहे.

डुप्लिकेट जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ऑफलाइन प्रक्रिया करता येते. संबंधित महापालिका/नगरपालिका कार्यालयात जाऊन डुप्लिकेट प्रमाणपत्राचा फॉर्म भरा.

अर्जदाराचे ओळखपत्र (आधार कार्ड), पालकांचे ओळखपत्र आणि जुना दाखला असेल तर त्याची झेरॉक्स जोडा. आज अर्ज भरून प्रक्रिया करा.

जर जुनी नोंद सापडली नाही तर ‘उशिरा नोंदणी’ प्रक्रियेद्वारे शपथपत्र देऊन नवीन दाखला मिळवता येतो. त्यासाठीचा अर्ज भरून द्यावा.

Comments are closed.