‘ती’ गोष्ट कोणालाच सांगणार नाही, मुलीला असे सांगणे विनयभंग नाही, हायकोर्टाचा निर्वाळा; गुन्हा केला रद्द

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुलीकडे शरीरसुखाची मागणी करताना आम्ही ही गोष्ट कोणाला सांगणार नाही, हे सर्व आपल्यातच राहील, असे तिला सांगणे म्हणजे विनयभंग नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.

हे संभाषण एक मुलगी व दोन मुलांमधील आहे. एका मुलाने मुलीकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यावेळी दुसऱ्या मुलाने मुलीला सांगितले की, ही गोष्ट आपल्यातच राहील. आम्ही दुसऱ्या कोणाला सांगणार नाही. त्या मुलाच्या या वाक्यातून वासनेचा हेतू व्यक्त होत नाही, असे न्या. शिवकुमार डीगे यांनी नमूद केले. एका आरोपीचा विनयभंगाचा गुन्हा रद्द करताना न्यायालयाने हा निर्वाळा दिला. तसेच त्या मुलाचे हे वक्तव्य गुन्हा ठरू शकत नाही, असेही न्या. डीगे यांनी स्पष्ट केले. एका मुलाने मुलीकडे शरीरसुखाची मागणी केली. ही गोष्ट कोणालाही सांगणार नाही, असे बोलून दुसऱ्या मुलाने या कृतीचे समर्थन केले. असे वर्तन विनयभंगाच्या व्याख्येत मोडते. परिणामी हा गुन्हा रद्द करू नये, असा युक्तिवाद पोलिसांनी केला. तो न्यायालयाने अमान्य केला.

एका मुलीवर धमकावून अत्याचार झाला. हा अत्याचार करणाऱ्या मुलाचे दोन मित्र दुसऱ्या दिवशी पीडितेकडे बघून हसले. त्यातील एकाने त्या मुलीकडे शरीरसुखाची मागणी केली. ही गोष्ट कोणाला सांगणार नाही. आपल्यातच राहील, असे दुसरा म्हणाला. पीडितेने याची तक्रार केली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी आरोपीने याचिका केली होती.

Comments are closed.