कल्याण टिटवाळ्यातील हायप्रोफाईल सोसायटीत पोलिसांची धाड; 6 कोटींच अमली पदार्थ जप्त, महिलेला अटक
मुंबई क्राईम न्यूज : मुंबईतील नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेचा वेग वाढवला आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी साकिनाका आणि टिटवाळा परिसरात मोठी कारवाई करत सुमारे 6 कोटी रुपये किमतीच्या 5 हजार एक्स्टसी गोळ्या जप्त केल्या आहेत. मुंबई साकीनाका पोलिसांनी पॉल नावाच्या महिलेला तिच्या टिटवाळ्यातील घरातून अटक केलीहे. तिच्या घराची झडती घेतली असता 6 कोटींचे ड्रग्ज सापडले आहे. नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. पोलिसांनी आधी साकीनाका येथून 200 गोळ्यांसह इरफान अन्सारीला पकडले, त्यानंतर सुफियानला अटक केली आणि त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून या महिलेपर्यंत पोलीस पोहोचले.
मुंबई गुन्हे: जप्त केलेल्या गोळ्यांवर मर्सिडीज, डॉलर यांसारखी विविध चिन्हे
दरम्यानही महिला पूर्वी डान्स बारमध्ये काम करायची. तिने दोन लग्ने केली असून तिचा पतीदेखील गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे समजते. ती दोन महिन्यांपूर्वीच कल्याण सोडून टिटवाळ्यात राहण्यासाठी गेली होती. पोलिसांनी तपासात तिच्या घरातून 4 ते 5 मोबाईल फोन आणि 8 सिमकार्ड जप्त केली आहेत. ड्रग्जच्या जप्त केलेल्या गोळ्यांवर मर्सिडीज, डॉलर यांसारखी विविध चिन्हे आणि अक्षरे कोरलेली आहेत. या हनुवटीहोयचा नेमका अर्थ काय? यात अजून कोण कोण सहभागी आहे? याचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मुंबई क्राईम न्यूज : सिनेस्टाईल कारवाईपुण्यात ड्रग्जचे धागेदोर हाती लागण्याची शक्यता
दुसरीकडेमुंबई ड्रग्जचे रॅकेट थेट कल्याण-टिटवाळामध्ये येऊन पोहोचल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुळची पुण्याची रहिवाशी असलेली अश्विनी फ्रान्सिस पॉल ही नवी मुंबईत राहत होती. ती लग्नाच्या पतीसोबत राहत नसून ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत राहत होती. तिचा बॉयफ्रेंड सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. कल्याण टिटवाळामधील पद्मावती रॉयल्समध्ये इमारत नंबर दोनमध्ये रूम नंबर 705 मध्ये राहत होती. मुंबई पोलिसांनी आणि कल्याण टिटवाळा ग्रामीण पोलिसांनी मिळून ही कारवाई केली. पोलिसांनी कारवाई दरम्यान कमालीची गुप्तता पाळली होती. इमारतीच्या परिसरात असलेले सीसीटीव्ही पोलिसांनी बंद करून ही कारवाई केली. जेणेकरून कारवाईची चर्चा कुठे होणार नाही, याची काळजी घेतली. अश्विनी आणखी कोणाच्या संपर्कात आहे का? ती मुळची पुण्याची रहिवासी असल्याने पुण्यात ड्रग्जचे धागेदोर हाती लागतात का? याचा शोध पोलीस घेत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.