ह्रदयद्रावक घटना… लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
लातूर: जिल्ह्यातील चाकूर (Latur) येथे धक्कादायक घटना घडली होती, येथील सहा वर्षीय देवांश मंगेश स्वामी या लहानग्याचा खून कुटुंबातीलच व्यक्तीने म्हणजेच त्याच्या चुलतीने केल्याची घटना रविवारी समोर आली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आता, जिल्ह्यातील खरोसा येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर एका विवाहित महिलेनं आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी (Police) तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे.
निकिता अमरदीप भूरे (वय 25) असे मृत महिलेचे नाव असून तिच्यासोबत तिची दोन लहान मुले शिवानी आणि शिवांश यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना त्यांच्या घराशेजारील विहिरीत घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पती-पत्नीचा घरगुती वाद टोकाला गेला आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे घडली. काल संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. त्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास निकिता भुरे या आपल्या दोन्ही मुलांना घेऊन घराबाहेर पडल्या. सकाळी त्या तिघांचा शोध घेण्यात आला, मात्र काहीच ठावठिकाणा लागला नाही. अखेर दुपारनंतर घराशेजारील विहिरीत तिघांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच किल्लारी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे खरोसा गावासह परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा
Satara : साताऱ्यात शिवसेनेची ताकद नाही असं महेश शिंदेंना वाटत असेल तर…; शंभुराज देसाईंचा पलटवार
आणखी वाचा
Comments are closed.