उद्धव ठाकरेंचे भाषण : आम्ही हिंदू आहोत! उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील रोखठोक भाषण

उद्धव ठाकरेंचे भाषण : आम्ही हिंदू आहोत! उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील रोखठोक भाषण

मागच्या कार्यक्रमाला मी इथं आलो होतो आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळाली, 58 वर्ष नेतृत्व करणं हे येड्या गबाळ्याचं काम नाही. जी परिस्थिती आपण पाहोत आहोत, आपण यावर काय बोलायच? बोलून काही होणार आहे का? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला. भारतीय कामगार सेनेच्या 58 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी राज्य आणि देशातील राजकीय परिस्थिती, कामगार क्षेत्रातील मक्तेदारी आणि केंद्रातील भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला. तसेच, राज्यातील महिला अत्याचारांवरुन फडणवीसांवरही जोरदार टीका केली.आपण जी दिशा पकडली आहे, त्यावरुन पुढील वाटचाल होणार आहे हाच आपल्या वार्षिक सभेचा हेतू आहे. दत्ताजी यांचं नाव घ्यायलाच पाहिजे. सन 1966 साली शिवसेना स्थापन झाली आणि दरवाज्याची बेल वाजली आणि दत्ता साळवी आले आणि म्हणाले नोकरी सोडून तुमच्यासोबत काम करणार. बाळासाहेब म्हणाले इकडे काही नाही, काळोख आहे, तरी ते म्हणाले तुमच्यासोबत काम करायचं आहे. आज हजारो लाखो लोकांना त्यांच्यामुळे नोकऱ्या मिळाल्यात ही जिद्द होती, अशी आठवण उद्धव ठाकरेंनी सांगितली.

Comments are closed.