जबरदस्तीने सिगारेटचे बिल भरायला सांगितले, नकार देताच टोळक्याचा तरुणांवर जीवघेणा हल्ला

नागपूर : उपराजधानी नागपूर (Nagpur) मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बारसमोर सिगारेटच्या किरकोळ वादातून दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख अकीन हा आपल्या मित्र मोहम्मद सिराजसोबत ‘हायवे बार अँड रेस्टॉरंट’ येथे जेवणासाठी गेला होता. यावेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही आरोपींनी त्यांना जबरदस्तीने सिगारेटचे बिल भरण्यास सांगितले. शेख अकीन आणि त्यांच्या मित्राने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर वाद चिघळला. त्यानंतर आरोपींनी आपल्या इतर साथीदारांना बोलावून दोघांवर चाकू, लोखंडी रॉड आणि लाकडी काठ्यांनी जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून काही वाहनांची तोडफोडही करण्यात आली.

Nagpur Crime: भररस्त्यात हल्ल्याचा थरार

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये भररस्त्यात उघडपणे मारहाण होत असल्याचे दिसत असून नागपुरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Police Action: 6 आरोपी अटकेत, 2 फरार

पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ कारवाई करत 6 आरोपींना अटक केली आहे, तर 2 आरोपींचा शोध सुरू आहे. अजहर, हुसैन उर्फ अरमान लोचा, राजा हिरोती, फरहान उर्फ फर्रा, पिंटू आणि इरफान शेख यांचा अटकेत असलेल्या आरोपींमध्ये समावेश आहे.

Attempt to Murder Case: हत्या करण्याचा प्रयत्नाचा गुन्हा

कपिलनगर पोलिसांनी या प्रकरणी हत्या करण्याचा प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, जखमी शेख अकीन आणि त्यांच्या मित्रावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.