लोणावळा फिरायला जाताय? ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान; व्हिला बुकींचा स्कॅम, पर्यटकाची फसवणूक
पुणे : अभिनेत्री रेखाच्या एका गाण्याचे बोल असे की, लोणावळा (Lonawala)खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा…. त्यामुळे लोणावळ हे ठिकाण पर्यटकांचं आकर्षणाचं ठिकाण बनलं आहे. डोंगराळ प्रदेशातील हिरव्या झाडांच्या गर्द सावलीत, खळखळ वाहणारे झरे पाहून पर्यटक निसर्ग सौंदर्य अनुभवायला लोणावळा सहलीचं नियोजन करतं. महाराष्ट्रासह देशभरातून लोणावळ्यात पर्यटक आनंद घेण्यासाठी येतात. मात्र, गेल्या काही दिवसांत लोणावळ्याच्या नावाने पर्यटकांची (Tourist) ऑनलाईन फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील एका पर्यटकाने ऑनलाईन व्हिला बुकींग गेला, मात्र त्या जागेवर कुठलाही बंगला नसल्याचे प्रत्यक्ष तिथं पोहोचवल्यावर उघडकीस आल्याने आपली फसवणूक झाल्याचे पर्यटकाच्या लक्षात आले.
पर्यटन नगरी म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात सध्या पर्यटकांची फसवणूक करणारा ऑनलाईन ‘व्हिला बुकिंग स्कॅम’ उघडकीस आला आहे. थंड हवेच्या ठिकाणाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात. मात्र, आता याच पर्यटकांना लक्ष्य करत सोशल मीडियावर आकर्षक व्हिला आणि बंगल्यांचे फोटो टाकून ऑनलाइन भामटे सक्रिय झाले आहेत.
बुकिंगच्या नावाखाली 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत आगाऊ रक्कम घेतली जाते, इतकंच नाही तर विश्वास बसावा म्हणून संबंधित ठिकाणाचे लाईव्ह लोकेशनही पाठवले जाते. मात्र, प्रत्यक्षात पर्यटक लोणावळ्यात पोहोचल्यावर त्या ठिकाणी कोणताही व्हिला किंवा बंगला अस्तित्वात नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. या वाढत्या फसवणुकीमुळे पर्यटक आर्थिक फटका सहन करत आहेत. तर दुसरीकडे स्थानिक व्यावसायिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या स्कॅममुळे लोणावळ्याच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर, स्थानिक व्यावसायिकांच्या मते, हे स्कॅम लोणावळ्यातील नसून बाहेरील भामट्यांकडून रचले जात आहेत.
अधिकृत वेबसाईटचाचा वापर करण्याचे आवाहन
दरम्यान, या फसवणुकीपासून वाचण्यासाठी पर्यटकांनी ऑनलाईन बुकिंग करताना अधिकृत वेबसाईट्सचाच वापर करावा आणि सतर्क राहावे, असं आवाहन करण्यात येत आहे. “ऑनलाईन बुकिंग करताना खात्री करूनच व्यवहार करा, अधिकृत माध्यमांचा वापर करा. “माझ्यासोबतही असा ऑनलाइन बुकिंगचा प्रकार झाला, त्यामुळे इतरांनी सावध राहावं असे मुंबईतील पर्यटक मयूर भानुशाली यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.