Supriya Sule speech Baramati : सुनेत्रा पवारांच्या प्रचारसभेत कंठ दाटला, सुप्रिया सुळेंचं UNCUT भाषण

बारामती : बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा रंगात आला असून आज (मंगळवारी, ता. 21) सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सांगता सभा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबीयांनी जोरदार प्रचार केल्यानंतर ही सभा निर्णायक ठरणार मानली जात आहे. सभेसाठी मोठी तयारी करण्यात आली असून राज्यातील प्रमुख नेतेही उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule)उपस्थित आहेत. यावेळी सुप्रिया सुळे बोलताना भावनिक झाल्या.

“गेले दोन-अडीच महिने आपल्या सगळ्यांसाठी खूप कठीण होते. दादा आज आपल्यात नाहीत, यावर आजही कोणाचा विश्वास बसत नाहीये,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सुनेत्रा पवार यांच्या निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेत बोलताना सुप्रिया सुळे अत्यंत भावूक झाल्या होत्या.

Supriya Sule : आशा काकींची भेट अन् अस्वस्थ मन

सभेला येण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी ‘काट्याची वाडी’ येथे जाऊन आशा काकींची भेट घेतली. त्या भेटीबद्दल सांगताना सुळे म्हणाल्या, “पुण्याहून बारामतीला आल्यावर काकींना भेटल्याशिवाय माझे मन अस्वस्थ होते. पण त्यांना भेटल्यावर ‘मी सभेसाठी आले आहे’ हे सांगण्याची हिंमत माझ्यात झाली नाही. त्यांना मी लग्नाचे निमित्त सांगितले. त्यांच्यासमोर उभं राहताना आजही मन भरून येतं.”

Comments are closed.