भयंकर अपघात टळला; दोन लोकल एकमेकांसमोर ठाकल्या! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर प्रवाशांचे हाल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मध्य रेल्वे प्रशासनाचा प्रवासी सुरक्षेतील अक्षम्य निष्काळजीपणा मंगळवारी दुपारी उजेडात आला. मुंबईतील सर्वाधिक वर्दळीचे स्थानक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर दोन लोकल ट्रेन समोरासमोर आल्या. गाडीला सिग्नल देण्यात चूक झाली आणि प्लॅटफॉर्मवर असलेल्या लोकलपुढे बदलापूरहून आलेली लोकल अवघ्या 120 मीटर अंतरावर येऊन ठेपली. मोटरमनने सतर्कता दाखवत गाडी थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली आणि दोन्ही लोकलमधील शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले. या घटनेचा लोकलसेवेवर मोठा परिणाम झाला. प्लॅटफॉर्म क्र. 5 ते 8 यादरम्यानची लोकल वाहतूक तब्बल 40 मिनिटे पूर्णपणे ठप्प झाली. सायंकाळच्या ‘पीक अवर्स’पर्यंत गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लाखो नोकरदारांचे हाल झाले.

Comments are closed.