हा महिलांचा विद्रोह; मोदी म्हणाले होते, महिला माफ करणार नाहीत! महाजनांच्या व्हायरल व्हिडीओवरून संजय राऊत यांचे भाजपवर टीकास्त्र
महिला आरक्षणाआडून सोयीची मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा डाव विरोधकांनी उधळून लावल्यानंतर भाजपने आता मोर्चे काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत सोमवारी काढण्यात आलेल्या मोर्चामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. वाहतूककोंडीमुळे संतप्त झालेल्या एका महिलेने गेट आऊट ऑफ हिअर… असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांना खडेबोल सुनावले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हाच संदर्भ देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, संजय राऊत यांनी हा महिलांचा विद्रोह असल्याचे म्हणत भाजपवर हल्ला चढवला. याबाबत त्यांनी एक्सवर एक पोस्टही शेअर केली असून “मोदी म्हणाले होते, महिला माफ करणार नाहीत”, असा टोलाही लगावला.
बातमी अपडेट होत आहे…
हे राम!
नारी शक्ती 💪 वंदना!
मोदीजी बरोबर होते.
“महिला माफ करणार नाहीत” pic.twitter.com/rvp5qGVgfX— संजय राऊत (@rautsanjay61) 22 एप्रिल 2026
Comments are closed.