कल्पना खरातनेही आता हात वर केले, बायको अशोक खरातबाबत काय काय म्हणाली? न्यायालयात हादरवणारा युक्
अशोक खरात पत्नी कल्पना खरात कोर्टात नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याची पत्नी कल्पना खरात (Kalpana Kharat) 31 मार्चपासून फरार आहे. कल्पना खरात हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज अहिल्यानगरमधील राहता न्यायालयात सुनावणी झाली. पती अशोक खरातच्या या कुकर्मांमध्ये त्याच्या पत्नी कल्पना खरात त्याला साथ दिली असल्याचं समोर आलं होतं. अनेक बँकेतील आणि जमीनीच्या घोटाळ्यांमध्ये कल्पना खरातसुद्धा होती असा आरोप आहे. याप्रकरणी कल्पना खरात हिने अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी पार पडली. यावेळी आरोपी कल्पना खरातचे वकील प्रशांत गिरी यांनी न्यायालयात झालेल्या युक्तिवादात कल्पना खरातचा कोणत्याही प्रकरणात सहभाग नसल्याचा दावा केला. कल्पना खरात हिचे सगळे खाते तिचे पती अशोक खरात हे ऑपरेट करत होते, असा युक्तिवाद प्रशांत गिरी यांनी केला. त्यामुळे कल्पना खरातने देखील हातवर करुन सगळे आरोप अशोक खरातवर ढकलल्याचे युक्तिवादावरुन दिसून येतंय.
न्यालचा भाऊ आज? (अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरात न्यायालयात)
- आरोपी कल्पना खरातचे वकील प्रशांत गिरी यांनी कोणता युक्तिवाद केला?
- तब्बल दीड वर्षांनंतर फिर्यादीने गुन्हा केला.
- कॅप्टन अशोक खरात यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर शिर्डी येथील गोंदकर यांनी जुन्या व्यवहाराचा फायदा मिळतो का या उद्देशाने शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
- जुन्या व्यवहाराचा फायदा मिळतो का या साठी गुन्हा दाखल केलाय.
- फिर्यादी म्हणतो की, किरण सोनवणे याने वेळोवेळी अशोक खरात याला भेटून पैसे दिले.
- मिटिंगमध्ये कल्पना खरात उपस्थित नव्हती.
- फिर्यादीच FIR मध्ये म्हणतो की कुठल्याही व्यवहाराला कल्पना खरात ही केव्हाच उपस्थित नव्हती.
- फिर्यादीकडे दिवाणी न्यायालयात जायला मुभा होती संधी होती तरी देखील ते गेले नाही.
- जमिनीचा व्यवहार झाल्यानंतर फिर्यादी याने जवळपास एक वर्ष कुठल्याही न्यायालयात दाद मागण्यासाठी गेला नाही. फक्त आणि फक्त अशोक खरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर जमीन परत मिळवण्यासाठी फिर्यादीने गुन्हा दाखल केला.
- जमिनीचा व्यवहार झाल्यानंतर फिर्यादी याने जवळपास एक वर्ष कुठल्याही न्यायालयात दाद मागण्यासाठी गेला नाही…फक्त आणि फक्त अशोक खरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर जमीन परत मिळवण्यासाठी फिर्यादीने गुन्हा दाखल केला.
- कल्पना खरात हिचे सगळे खाते तिचे पती कॅप्टन अशोक खरात हे ऑपरेट करत होते.
- फक्त पत्नी कल्पना खरात हिच्या खात्यातून पैसे गेले म्हणून तिला आरोपी करता येणार नाही , अशोक खरात याने व्याजाची रक्कम मागितली आहे कल्पना खरात हिने कधीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष व्याजाची रक्कम फिर्यादील मागितली नाही.
- कल्पना खरात आयकर विभागाला संपूर्ण आयकर भरते.. शिवसंकल्प हार्डवेअर हा माझा व्यवसाय…- आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद…
- कल्पना खरातच्या विरहित जमिनीचा व्यवहार झालेला आहे…त्यामध्ये आरोपी करू नये..कल्पना खरात विरोधात याआधी कुठलेही FIR फसवणूकबाबत नाही..
- वरील मुद्दयांचा विचार करून कल्पना खरात हिला अटकपूर्व जामीन मिळावा.
सरकारी वकील बी. डी.पानगव्हाणे यांनी कोणता युक्तिवाद केला? (Ashok Kharat Wife Kalpana Kharat In Court)
- आरोपीच्या वकिलांचे म्हणणे आहे. त्यांच्या खात्यातून व्यवहार झाले हे मान्य आहे. मात्र त्या म्हणताय की मी ते व्यवहार केले नाही माझ्या पतीने केले.
- मुखत्यार पत्र करण्यासाठी कल्पना राहत्याला आल्या होत्या.
- 23 तारखेला खरेदी झाली असली तरी खरेदी खत हे 22 तारखेलाचं का बनवले? आणि 22 तारखेलाच मुखत्यार पत्र बनवले?
- जमीन खरेदी व्यवहाराच्या कागदपत्रांवर कल्पना खरात यांची सही आणि अंगठा आहे.
- मुखत्यार पत्रामध्ये कल्पना खरात हिने 2 टक्के व्याज दर तीन महिन्याला देण्यात यावं हे कल्पना खरात हिने ठरवलं…
- कल्पना खरात हिच्या खात्यातून फिर्यादीला पैसे गेले आहे…
- जितेंद्र शेळके आणि महेंद्र शेळके हे देखील या व्यवहाराचे साक्षीदार यांचे देखील जबाब झालेले आहेत.
- आरोपीला सावकारी परवाना होता का..? आम्ही चौकशी केली या दोघांना सावकारी परवाना नव्हता.
- मूळ आरोपी अशोक खरात आणि कल्पना खरात यांचे मिळून तीन राष्ट्रीयकृत बँकेत खाते… तपासी अधिकाऱ्याची कोर्टाला माहिती..
- कल्पना खरात हिला हा व्यवहार मान्य होता त्यामुळे तिने चेक दिले आणि रक्कम पाठवली.
- कल्पना खरात म्हणते की माझे सगळे व्यवहार माझे पती करत होते..जर यांचे पती व्यवहार करत होते तर कल्पना खरात हिने त्यांच्यावर तक्रार का दाखल केली नाही.
तपास अधिकारी यांनी कोणता युक्तिवाद केला? (Ashok Kharat Wife Kalpana Kharat In Court)
- कल्पना खरात हिच्या खात्याचा तपशील पोलिसांनी केला सादर
- कल्पना खरात हिच्या खात्यावरून सात कोटींचा व्यवहार झाल्याचं उघड…
- कल्पना खरात ही कुठेही नोकरीला नसताना कुठलाही व्यवसाय नसतांना व्यवहार झाला कसा…?
- खरात यांच्या 40% टक्के मालमत्ते मध्ये कल्पना खरात भागीदार असल्याने अशोक खरात याचे व्यवहार कल्पना खरात हिला महित होते.
- सरकारी कार्यालयात प्रत्येक खरेदीला कल्पना खरात गेली आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.