सुनेत्रा पवारांबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, ‘ त्या फक्त पहिल्या उपमुख्यमंत्

देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार: अजितदादांनी बारामतीकरांसाठी पाहिलेली सर्व स्वप्नं पूर्ण करण्याची क्षमता सुनेत्रा पवार यांच्यामध्ये आहे. त्यांच्या रुपाने महाराष्ट्राला आणखी एक सक्षम नेतृत्व लाभलं आहे, असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. ते मंगळवारी बारामती पोटनिवडणुकीच्या (Baramati bypoll 2026) प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सांगता सभेत बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या ठायी दीर्घ पल्ल्याचे राजकारण करण्याची क्षमता असल्याचे बोलून दाखवले. (Baramati Byelection 2026 rally)

मी तुम्हाला दाव्याने सांगतो की, गेल्या दोन-अडीच महिन्यांमध्ये मी सुनेत्रा वहिनींचं काम बघितले आहे. मला राजकारणात लोकप्रतिनिधी म्हणून 35 वर्षे झाली आहेत. त्यामुळे एखाद्या नेत्याची क्षमता काय आहे, हे ओळखण्याची माझीही क्षमता तयार झाली आहे. त्यावरुन मी तुम्हाला सांगतो की, अजितदादांची स्वप्नं पूर्ण करण्याची सर्व क्षमता वहिनींमध्ये आहे. वहिनींच्या रुपाने महाराष्ट्राला केवळ पहिल्या उपमुख्यमंत्री नव्हे तर एक सक्षम नेतृत्व लाभले आहे. हे सांगताना माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. (Maharashtra Politics news)

अजितदादांच्या पश्चात वहिनींनी आपल्या हातात धुरा घेतली आहे. त्या काम करत आहेत, कर्तव्याच्या भावनेतून त्यांनी धुरा आपल्या हातात घेतली आहे. त्या खासदार झाल्यापासून राजकीय अनुभवातून धुरा त्यांनी हातात घेतली आहे. अजित दादांसोबत सामाजिक, आर्थिक, शिक्षण क्षेत्रात वहिनीनी काम केलं आहे. त्यामुळे राजकारणदेखील त्यांनी जवळून बघितलं आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

Sunetra Pawar news: अजितदादांच्या विमान अपघाताचे सत्य बाहेर आल्याशिवाय शांत बसणार नाही: देवेंद्र फडणवीस

अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत, मात्र, या अपघाताचं सत्य बाहेर आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीकरांना दिला. बारामतीची आजची सांगता सभा म्हणजे अजितदादांच्या स्मृतीचा हा यज्ञ सुरू आहे, या यज्ञात आपली आहुती टाकली नाही तर मनात काहीतरी हुरहूर राहिली असती. त्यामुळेच, दादांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आम्ही इथं आलोय. सुनेत्रा वहिनींना  सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करत, बारामतीकरांनी (Baramati) आपल्या मतांची आहुती या स्मृतीयज्ञात द्यायची आहे, नाहीतर आपण करंटे ठरु, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

आणखी वाचा

अजितदादांच्या अपघाताबाबत सुनेत्रा पवारांनी अखेर मनातलं बोलून दाखवलं; फडणवीस, पटेल, तटकरेंसमोर काय म्हणाल्या?

आणखी वाचा

Comments are closed.