कॅलिफोर्नियात उड्डाण सरावादरम्यान जेट विमानाला अपघात, विजेच्या तारांना धडकून जमिनीवर कोसळले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कॅलिफोर्नियातील पाकोइमा येथे उड्डाण सरावादरम्यान लहान जेट विमान कोसळल्याची घटना घडली. या अपघातात वैमानिक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. हा अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लॉस एंजेलिस अग्निशमन दलाच्या हवाल्याने लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हे विमान व्हिस्टा एव्हिएशनच्या मालकीचे असून ते वैमानिकाने भाड्याने घेतले होते. हे सिंगल-इंजिन विमान उड्डाणांचा सराव करत असतानाच विजेच्या तारांना धडकले. यानंतर वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि ते जमिनीवर कोसळले. उड्डाणानंतर अवघ्या 10 मिनिटांनी विमान कोसळले. या अपघातानंतर परिसरातील काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता.

Comments are closed.