मध्यस्थीत पाकिस्तान अमेरिकेची बाजू घेत पक्षपातीपणा करत आहे; इराणच्या मीडियाचा आरोप

आखाती देशातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. इराणच्या प्रसारमाध्यमांनी पाकिस्तान आणि त्यांचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांना थेट लक्ष्य केले आहे. इराणचा आरोप आहे की, अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी करणारा पाकिस्तान आता निष्पक्ष दिसत नाही. इराणला वाटते की, या संपूर्ण प्रक्रियेत पाकिस्तान उघडपणे अमेरिकेच्या बाजूने पक्षपात आहे. त्यामुळे ही शांतता चर्चेवरच आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

पाकिस्तान इराणमधील युद्ध थांबवल्याची बढाई पाकिस्तान करत होता. शांतता चर्चेची पहिली फेरी इस्लामाबादमध्ये झाली. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर, चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुढाकार घेतला जात होता. मात्र, दोन आठवड्यांचा शस्त्रसंधीची मुदत संपूनही अद्याप शांतता चर्चेसाठी कोणतीही बैठक निश्चित झाली नाही.

इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानच्या मध्यस्थीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. इराणी माध्यमांनी फील्ड मार्शल असिम मुनीर यांच्यावर अमेरिकेकडे झुकल्याचा आरोप केला आहे. याचा परिणाम शांतता चर्चेवर होऊ शकतो आणि पाकिस्तानची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात येऊ शकते.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना शस्त्रसंधी वाढवावी लागली आणि त्यांनी सांगितले की ही मुदतवाढ पाकिस्तानच्या विनंतीवरून होती. मात्र, आता इराणनेच पाकिस्तानच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी पाकिस्तानच्या भूमिकेवर उघडपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मध्यस्थाने दोन्ही बाजूंमध्ये समान पातळीवर उभे राहिले पाहिजे, परंतु पाकिस्तान हा निकष पूर्ण करत नाही. पाकिस्तान संतुलित भूमिका बजावत नाही, असे इराणच्या प्रसार माध्यमांनी म्हटले आहे.

इराणचा आरोप आहे की, पाकिस्तानची भूमिका अमेरिकेकडे झुकलेली आहे. पाकिस्तानचे फील्ड मार्शल असिम मुनीर आणि त्यांच्या सरकारवर राजनैतिक आणि कथनात्मक अशा दोन्ही स्तरांवर अमेरिकेच्या हितांना पुढे नेल्याचा आरोप आहे, ज्यामुळे मध्यस्थीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

असिम मुनीर तेहरानला गेले आणि एक प्रस्ताव घेऊन परतले. हा प्रस्ताव अमेरिकेपर्यंत पोहोचेल आणि त्यावर प्रतिसाद मिळेल अशी आशा होती. मात्र, इराणचे म्हणणे आहे की अद्याप कोणताही स्पष्ट प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पाकिस्तानने संदेश योग्यरित्या पोहोचवला की नाही याबद्दलची शंका अधिकच वाढली आहे.

इराणी माध्यमांनी पाकिस्तान आणि त्यांच्या फील्ड मार्शलवर दुहेरी भूमिका घेतण्याचा आरोप केला आहे. एकीकडे ते स्वतःला शांततादूत म्हणवत आहेत, तर दुसरीकडे ते अमेरिकेची बाजू घेत असल्याचे दिसत आहे. या आरोपामुळे पाकिस्तानच्या प्रतिमेवर थेट परिणाम होतो आणि मध्यस्थ म्हणून त्याची भूमिका कमकुवत होते.

या संपूर्ण वादामुळे शांतता चर्चेवरही परिणाम होत आहे. जर एका बाजूला असे वाटले की मध्यस्थ निष्पक्ष नाही, तर चर्चा पुढे जाणे कठीण होते. यामुळेच आता मुनीर यांच्यावर इराणच्या अटींकडे दुर्लक्ष करून केवळ वाटाघाटी पार पाडल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आता शांतता प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

Comments are closed.