‘एशियाटिक’ निवडणुकीचा हायकोर्टात आज निकाल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या निवडणूक प्रक्रियेच्या वादावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. एशियाटिक सोसायटीच्या निवडणूक संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकांवर युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने या प्रकरणावरील निकाल राखून ठेवला आहे. हा निकाल उद्या गुरुवारी 23 एप्रिल रोजी न्यायमूर्ती फरहान दुभाष जाहीर करणार आहेत.

एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांनी स्थगिती दिली असून नव्याने वैध व पात्र मतदारांची यादी तयार करण्यासाठी उपसमित्या स्थापन करण्याचे आदेश दिले होते. धर्मदाय आयुक्तांच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. अध्यक्ष पदाचे उमेदवार कुमार केतकर, विश्वस्त विश्वास उटगी, धनंजय शिंदे व स्वाती दाते यांनी याप्रकरणी अॅड. स्वरूप पाटील यांच्यामार्फत याचिका दाखल केली असून सर्व पक्षकारांचा याचिकेवरील युक्तिवाद गेल्या आठवडय़ात पूर्ण झाला. न्यायमूर्ती फरहान दुभाष यांनी हा निकाल राखून ठेवला. उद्या गुरुवारी हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Comments are closed.