कोणत्याही प्रकारची तक्रार असू दे, मुंबईकरांसाठी पालिकेचा एक ‘मार्ग’, मॅनेजमेंट अॅण्ड रीर्डेसल ऑफ ग्रिव्हेन्स उपक्रमाचा शुभारंभ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

खड्डा पडला, कचरा साठला, पाणी आले नाही अशा कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यासाठी पालिकेने मुंबईकरांना ‘मॅनेजमेंट अॅण्ड रीर्डेसल ऑफ ग्रिव्हेन्स’ अर्थात एकच मार्ग उपलब्ध करून दिला आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवल्यानंतर तातडीने ही तक्रार संबंधित विभागाला कळवण्यात येईल आणि तक्रारीचे निवारण करण्यात येईल.

मुंबईकरांच्या तक्रार निवारणासाठी महानगरपालिकेकडून www.mcgm.gov.in हे संकेतस्थळ, नागरी मदतसेवा क्रमांक 1916, ‘माय बीएमसी’ मोबाईल अॅप, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, ‘खड्डे त्वरित दुरुस्ती’ (Pothole Quick Fix) प्रणाली, प्रत्यक्ष पत्राद्वारे तक्रारी तसेच सामाज माध्यमे (एक्स, फेसबुक, इन्स्टाग्राम) अशा विविध माध्यमांचा वापर करण्यात येतो. या सर्व सेवांना अधिक सक्षम करण्यासाठी माहिती-तंत्रज्ञान विभागामार्फत ‘मार्ग प्रणाली’ सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आज महापौर रितू तावडे यांच्या हस्ते मुख्यालयात करण्यात आला. यावेळी सभागृह नेते गणेश खणकर, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त अश्विनी भिडे आदी उपस्थित होते.

Comments are closed.