अजितदादांच्या मनासारखं राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं असतं तर 2029 च्या निवडणुकीत दादा मुख्यमंत्र

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या निधनानंतर होत असलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रकिया पार पडत आहे. याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला आणि बारामतीकर यावेळी भरभरून मतदान करतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी रोहित पवारांना (Rohit Pawar) पत्रकारांनी विलीनीकरणाबाबतचचा प्रश्न विचारला असता त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, जर अजितदादा असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण झाले असते, तर 2029 मध्ये दादा 100% या राज्याचे मुख्यमंत्री झाले असते. (Rohit Pawar)

Rohit Pawar : 2029चे या राज्याचे मुख्यमंत्री हे अजित दादा 100% झाले असते…

अजित दादा असताना विलीनीकरण होणार होतं, दादा असताना विलीनीकरण झालं असतं, तर आता मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतोय, 2029 चे या राज्याचे मुख्यमंत्री हे अजित दादा 100% झाले असते, आज दादा नसल्यामुळे दादांची इच्छा ती होती आणि तेच आज नसतील ते पुढाकार घेणारे व्यक्तिमत्व होते, दादा नसतील तर आज विलीनीकरणाचा प्रश्न उद्भवत नाही, असंही रोहित पवारांनी म्हटलंय. त्याचबरोबर पुढे रोहित पवार म्हणाले, अनेक लोकांचं म्हणणं आहे तुम्ही प्रचारासाठी का करत आहे, आमची दादांच्या प्रती काहीतरी जबाबदारी आहे. आज आपल्यात दादा नाहीत. त्यांचा अपघात कसा झाला? काय झालं? हे आम्ही शोधतच आहे. पण दादा नसताना त्यांच्याकडे बघून पोटनिवडणुकीमध्ये लोकांनी निर्णय घेतला. भावनिक दृष्टिकोनातून प्रचाराला येणे आम्हाला योग्य वाटले , त्यामुळे आम्ही प्रचार केला, पण आता विलीनीकरण होणार किंवा त्याची चर्चा होईल अशी चर्चा नाही, असे पुढे रोहित पवारांनी म्हटलं आहे.

Rohit Pawar :  दादांच्या प्रती असलेल्या आदरापोटी ते प्रचारात सहभागी

दादांच्या निधनानंतर आता विलीनीकरणाचा प्रश्नच उरत नाही. दादा ही अशी व्यक्ती होती जी पुढाकार घेत होती, पण त्यांच्या पश्चात आता हा विषय चर्चेत नाही. तर रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, ते सुनेत्रा काकींच्या प्रचाराला आले आहेत, याचा अर्थ विलीनीकरण होणार असा होत नाही. हा सर्वस्वी एक भावनिक निर्णय असून दादांच्या प्रती असलेल्या आदरापोटी ते प्रचारात सहभागी झाले आहेत.  त्याचबरोबर 2029 मध्ये बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढाई होऊ शकते, अशी शक्यता त्यांनी नाकारली नाही. जरी कौटुंबिक इच्छा एकत्र येण्याची असली, तरी राजकीय पक्ष आणि भूमिका वेगळ्या असल्याने संघर्ष होऊ शकतो, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

Rohit Pawar :  बारकाईने लक्ष द्यायचे आणि टोमणेही मारायचे

रोहित पवार म्हणाले की, दादा बोलायला कडक आणि परखड असायचे, पण मनातून ते अत्यंत मवाळ होते. अधिवेशनामध्ये सुद्धा ते बोलण्याकडे, पेहरावाकडे (केस वाढणे, शर्टचे बटन) बारकाईने लक्ष द्यायचे आणि टोमणेही मारायचे. बारामतीकर दादांच्या काम करण्याच्या स्टाईलला मिस करत आहेत. “काम होणार असेल तर ‘हो’ आणि नसेल होणार तर ‘नाही” ही त्यांची स्पष्टवक्ती वृत्ती आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता वाखाणण्याजोगी होती.

दादांच्या प्रती असलेल्या आदरापोटी बारामतीकरांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. शहरामध्ये काही मतदारांची नावे त्यांच्या मूळ बूथवर न येता लांबच्या बूथवर आली आहेत. तरीही कार्यकर्त्यांची मदत घेऊन लांब जाऊन मतदान करा, असे त्यांनी मतदारांना सुचवले. मतदानासाठी दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा आणि कर्मचाऱ्यांचे मतदान झाल्याशिवाय त्यांना कामावर न घेण्याचा जो निर्णय व्यापारी संघटनेने घेतला, त्याचे रोहित पवारांनी स्वागत केले.

Rohit Pawar : 2029 ची निवडणूक आणि ‘पवार विरुद्ध पवार’

रोहित पवारांनी 2029 च्या बारामतीच्या विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना म्हटलं की, 2029 ची निवडणूक पवार विरुद्ध पवार होऊ शकते. जयच्या विरोधात युगेंद्र उमेदवार असु शकतो. पवार विरुद्ध पवार लोकसभेला झालंय, विधानसभेला झालंय आणि २०२९ ला देखील होऊ शकतं. पवार विरुद्ध पवार व्हावं ही लोकांची इच्छा नाही, मात्र काही जण पवार विरुद्ध पवार व्हावं यासाठी काम करतायंत, असंही पुढे रोहित पवारांनी म्हटलं आहे.

तर मी 2019 आणि 2024ला कर्जत-जामखेडमधून लढलो आहे आणि तिथेच राहणार आहे,” असे सांगत त्यांनी बारामतीतून निवडणूक लढवण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.