आयपीएलमध्ये रविंद्र जडेजाचा तडाखा! आता लक्ष्य एमएस धोनीचा मोठा विक्रम

लखनऊ सुपरजायंट्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या दिग्गज अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने जबरदस्त कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. टॉप ऑर्डर कोसळल्यानंतर जडेजाने जबाबदारी घेत 29 चेंडूत 43 धावांची तुफानी खेळी साकारली. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 1 षटकार ठोकत राजस्थानचा डाव सावरला. त्याच्या या दमदार योगदानामुळे राजस्थानने 20 षटकांत 159 धावा उभारल्या.

गोलंदाजीतही जडेजाने प्रभाव दाखवत निकोलस पूरनचा महत्त्वाचा बळी घेतला आणि सामन्याचा कल राजस्थानकडे झुकवला. अखेरीस राजस्थानने हा सामना 40 धावांनी जिंकत मोठा विजय नोंदवला.

या शानदार ऑलराऊंड कामगिरीसाठी जडेजाला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा मान मिळाला. आयपीएल कारकिर्दीत हा त्याचा 17 वा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार ठरला. विशेष म्हणजे राजस्थान रॉयल्ससाठी हा त्याचा पहिलाच पुरस्कार आहे, तर याआधी त्याने चेन्नई सुपर किंग्जकडून 16 वेळा हा पुरस्कार जिंकला होता.

आता जडेजा आणखी एकदा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरल्यास तो एमएस धोनीच्या 18 पुरस्कारांच्या विक्रमाशी बरोबरी करेल.आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकण्याच्या यादीत विराट कोहली 21 पुरस्कारांसह अव्वल स्थानी आहे. रोहित शर्मा 19 पुरस्कारांसह दुसऱ्या स्थानी, तर धोनी तिसऱ्या स्थानी आहे. जडेजा चौथ्या क्रमांकावर असून युसूफ पठान 16 पुरस्कारांसह पाचव्या स्थानी आहे.

आयपीएलमध्ये भारतीय खेळाडू म्हणून सर्वाधिक सामनावीर पुरस्कार

रोहित शर्मा – २१

विराट कोहली – १९

एमएस धोनी – १८

रवींद्र जडेजा – १७*

युसूफ पठाण – 16

या विजयासह राजस्थान रॉयल्सने 7 सामन्यांत 5 विजय मिळवत 10 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. उर्वरित सामन्यांपैकी आणखी 2 विजय मिळाल्यास संघाचा प्लेऑफ प्रवेश निश्चित होणार आहे.

Comments are closed.