भारत-आफ्रिका शिखर परिषदेचा लोगो आणि वेबसाइट लाँच करण्यात आली

भारताच्या विदेश धोरणात आफ्रिकेचे महत्त्वाचे स्थान : एस. जयशंकर

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारताच्या विदेश धोरणात आफ्रिकेचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. आफ्रिकेसोबत भारताचे नाते एका स्वच्छ विचारासह पुढे जात आहे. हे नाते समानता, परस्पर सन्मान आणि एकत्रित येत प्रगती करण्याच्या तत्वावर टिकलेले आहे असे उद्गार विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी काढले आहेत. जयशंकर यांच्या हस्ते आगामी भारत-आफ्रिका शिखर परिषदेचा लोगो थीम आणि वेबसाइटचे अनावरण करण्यात आले आहे. आफ्रिकन देश पारतंत्र्याच्या विरोधात लढत असताना भारत त्यांच्यासोबत मजबुतीने उभा होता.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास देखील आफ्रिकेशी जोडलेला आहे. संघर्ष, एकजूटता आणि पुढे जाण्याचे आमचे संयुक्त प्रयत्न आजही आमच्या मैत्रीला नवे रुप देत आहेत. भारताचे विकास भारत 2047 चे लक्ष्य आणि आफ्रिकेचा अजेंडा 2063 परस्परांना पूरक आहेत. या दोन्ही योजना शाश्वत विकास आणि समावेशक प्रगतीचा मार्ग दाखवितात. भारत आणि आफ्रिकेदरम्यान राजनयिक चर्चा आणि संपर्क सातत्याने वाढत असल्याचे वक्तव्य जयशंकर यांनी केले.

Comments are closed.