Bhandup News – भांडुपमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत दुर्घटना; 10 जण जखमी तर एकाचा मृत्यू
मुंबईतील भांडुप परिसरातील जनता मार्केट येथे एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये रात्री उशिरा भीषण दुर्घटना घडली. इमारतीवरून 10 जण खाली कोसळल्याने झालेल्या या अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एकूण 10 जण जखमी झाले .
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अतिशय विचित्र पद्धतीने घडली. सुरुवातीला एक तरुण पहिल्या मजल्यावरून थेट बेसमेंटमध्ये कोसळला होता. त्याला वाचवण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी गेलेले इतर आठ जणही तोल जाऊन खाली कोसळले. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली, त्या इमारतीच्या शेजारीच एका लग्न सोहळा सुरू होता. जखमी झालेल्या आणि कोसळलेल्या व्यक्तींपैकी 6 जण हे लग्नासाठी आलेले पाहुणे होते, तर उर्वरित 4 जण इमारतीवर काम करणारे कामगार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईतील भांडुप परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खड्ड्यात पडल्याने एक ठार, १० जखमी: अधिकारी. pic.twitter.com/myE6PkPkag
— प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (@PTI_News) 24 एप्रिल 2026
या दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी 8 जणांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, तर दोघांची प्रकृती पाहता त्यांच्यावर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे लग्नकार्याच्या आनंदावर विरजण पडले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि संबंधित प्रशासन याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Comments are closed.