आमदार संजय गायकवाडांवर छत्रपती शाहू महाराज संतापले, आमदारकी रद्द करण्याची मागणी, म्हणाले, सरकार
शाहू महाराज आणि संजय गायकवाड: शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या शीर्षकावरुन कोल्हापूरमधील प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करुन त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे आमदार संजय गायकवाड यांच्याविषयी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे. संजय गायकवाड यांनी केलेलं वक्तव्य जनता सहन करणार नाही. कोणाबद्दल काय बोलायचं हे त्यांना समजायला हवं, असे शाहू महाराज छत्रपती यांनी म्हटले. ते शुक्रवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Politics News)
यावेळी शाहू महाराज छत्रपती यांनी संजय गायकवाड यांच्याविरोधात कठोर कारवाईची गरज व्यक्त केली. यासंदर्भात सरकारला जी योग्य वाटले, ती कारवाई लवकर करावी. या सरकारमध्ये काही गोष्टी लगेच होत नाहीत. आमदारकी रद्द करण्यासंदर्भात काय नियम आहेत हे मला माहीत नाही. मात्र, संजय गायकवाड यांनी ज्या तऱ्हेने त्यांनी वक्तव्य केलं ते बिलकुल योग्य नाही. संजय गायकवाड यांच्या वक्तव्याकडे जनताच आता लक्ष देईल, अशी प्रतिक्रिया शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केली.
दरम्यान, ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी याप्रकरणी गुरुवारी कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी तुर्तास संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन घेण्यास नकार दिला. आम्ही आमच्या वकिलांशी बोलून तुम्हाला कळवतो, असे पोलिसांनी प्रशांत आंबी यांना सांगितले.
Sanjay Gaikwad on Shivaji Kon hota Book: नेमकं प्रकरण काय?
आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी (Prashant Ambi) यांना फोन करुन शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) अनादर केल्याचे म्हणत शिवीगाळ केली होती. अरे गोविंद पानसरे (Govind Pansare) हा छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरीत शिवाजी म्हणणारा कोण होता? मला हे पुस्तक वाचायची गरज नाही. तुमच्यासारखे नालायक लोक शिवाजी महाराजांना एकेरी भाषेत बोलतात. तुला माहितीये ना, त्या गोविंद पानसरेचं काय झालं, त्याची अवस्था काय झाली? मी तुलाही घरात घुसून मारेन, तुला चिरडून टाकेन, तुझी जीभ छाटेन, अशी धमकी संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना दिली होती.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.