महाजनांना गेट आऊट म्हणणाऱ्या महिलेवर झेन सदावर्ते संतापली; म्हणाली, ‘मर्सिडीजमधून प्रवास करणाऱ्

गिरीश महाजन आणि झेन सदावर्ते: मुंबईतील वरळी परिसरात भाजपच्या जनआक्रोश मोर्चादरम्यान एक हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. वाहतूक कोंडीमुळे संतप्त झालेल्या एका महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना अडवून त्यांना “इथून चालते व्हा” (Get Out) अशा शब्दांत खडेबोल सुनावले होते. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते (Zen Sadavarte) हिने या महिलेविरोधात वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Girish Mahajan : नेमकी घटना काय?

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजपने वरळीच्या जांबोरी मैदानापासून एनएससीआय डोमपर्यंत जनआक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चामुळे वरळी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. यावेळी एका स्थानिक महिलेने आपला संयम गमावला आणि थेट मंत्री गिरीश महाजन यांना अडवून प्रश्नांचा भडिमार केला. “तुमचं हे काय चाललंय? इथून चालते व्हा! तुमच्या मोर्चामुळे शेकडो लोक अडकले आहेत,” अशा शब्दांत महिलेने महाजनांना खडेबोल सुनावले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यानंतर या महिलेविरोधात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते हिने वरळी पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली आहे.

Zen Sadavarte: त्या महिला पोलिसांना शिवीगाळ करत होत्या

या प्रकरणावर बोलताना झेन सदावर्ते म्हणाली की, एक महिला कोण आहे? मर्सिडीज किंवा बसमधून येतायत. त्या महिला पोलिसांना शिवीगाळ करत होत्या, अपशब्द बोलत होत्या. पोलिसांचा अपमान त्यांनी उघडपणे केला आहे. दिवसरात्र पोलीस आपली रक्षा करतात, आणि त्यांना काय तर शिव्या? महिला आरक्षणासंदर्भात मोर्चा होता, डिलिमिटेशन संदर्भात होता. मी तक्रार अशा विरोधात केली आहे. वाहतूक कोंडी झाली होती, अडथळा झाला. मात्र, मोर्चाच्या संघर्षातूनच लोकांना न्याय मिळाला आहे. रस्त्यावर येऊन आवाज उचलला नाही तर न्याय कसा मिळणार? असा सवाल तिने उपस्थित केला.

Zen Sadavarte: मी तक्रार दाखल केलीय

झेन सदावर्ते पुढे म्हणाली की, आधी महिलांना समान वागणूक मिळत नव्हती. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे सर्व मिळालं आहे. जेव्हा जेव्हा अडचणी येतील, तेव्हा तेव्हा लोकं रस्त्यावर येतील. तुम्हाला मर्सिडीजमधून प्रवास करताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असेल तर मग होऊ द्या. मी तक्रार दाखल केली आहे. एफआयआर दाखल करण्यासंदर्भात पोलीस मला बोलवतील, अशी प्रतिक्रिया तिने दिले आहे.

आणखी वाचा

Mumbai Women Angry Girish Mahajan Video: पोलिसांना नडली, गिरीश महाजनांना तोंडावर म्हणाली, इथून चालते व्हा…; महिला का चिडली, नेमकं काय घडलेलं?, VIDEO

आणखी वाचा

Comments are closed.