Video : मुंबईत संजय निरुपम अन् मनसैनिकांत राडा; आधी कारची हवा सोडली, पुन्हा बाटलीही फेकली

मुंबई : शहरातील रिक्षावाल्यांना मराठीची (Marathi) सक्ती करण्याचा निर्णय राज्याच्या परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. सरनाईक यांच्या या निर्णयाचं शिवसेना, मनसे पक्षाकडून स्वागत होत असून शिवसेना नेते माजी खासदार संजय निरुपम यांनी या सक्तीला आपला विरोध केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज संजय निरुपम हे दहिसरमधील रिक्षा चालकांसोबत संवाद साधण्यासाठी आले होते. त्याचवेळी, मनसैनिकांनी (MNS) दहीसरमध्ये धाव घेत संजय खासदार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे, मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठीची घोषणा देत संजय निरुपम यांच्या कारची हवा सोडली, त्यांच्या गाडीवर बाटली फेकून मारल्याने चांगलाच गोंधळ उडाल्याचं दिसून आलं.

संजय निरुपम यांनी मराठी सक्तीच्या मुद्द्यावरुन विरोध करत रिक्षाचालकांसोबत संवाद साधल्याचे कळताच मनसेने सुद्धा मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह दहीसर येथील रिक्षा स्टॉप गाठत संजय निरुपम यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. एकीकडून शिंदे शिवसेना पदाधिकारी तर दुसरीकडून मनसे पदाधिकारी असा साधारणपणे अर्धा ते पाऊण तास गोंधळ पाहायला मिळाला. जोपर्यंत संजय निरुपम जात नाही तोपर्यंत आंदोलन आम्ही करत राहणार असा पवित्रा मनसैनिकांनी घेतला होता. सगळ्यांसोबत संवाद साधून संजय निरुपम त्या ठिकाणाहून निघत असताना मनसैनिक आक्रमक झाले, त्यांनी निरुपम यांच्या गाडीवर बाटल्या, दगड फेकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी गोंधळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि वातावरण शांत केलं. मात्र, या घटनेनं शिवसेना आणि मनसैनिकांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.

पोलिसांकडून मनसैनिकांची धरपकड (Police arrest MNS sanjau nirpum)

पोलिसांनी तात्काळ घटनेचं गांभीर्य लक्षात घेत मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली होती, मनसे कार्यकर्ता आणि पोलिसांमध्ये झडप पाहायला मिळाली. पोलिसांनी काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू आहे. दरम्यान, हल्ला करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांचा आम्हाला अभिमान आहे, निरुपम हा मराठी द्वेषी आहे. दहिसरमध्ये मराठी भाषेला विरोध करणार तर आम्ही खपून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया येथील मनसे नेते नयन कदम यांनी घटनेवर दिली.

गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवर टीका

दरम्यान, दुसरीकडे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीही रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीला विरोध करत थेट मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनाच लक्ष्य केलंय. रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या संपावेळी मराठी रिक्षाचालकांना कोणी अडवले तर आम्ही त्यांना मनसे स्टाईलने धडा शिकवू, असा इशारा अमित ठाकरे यांनी दिला होता. आता, त्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी खिल्ली उडवली आहे. राज ठाकरेंची औलाद काय भाषा बोलते, मारुन काढू… अमित ठाकरे हवालदार झालेत का?  त्यांचे बोलणे सुज्ञपणाचे नाही. तुम्ही हवालदार झाला आहात की आरटीओचे शिपाई झाला आहात? अमित ठाकरे यांना मारहाणीचा बॅच मिळालाय का, असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केला. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा

राज ठाकरेंची औलाद काय भाषा बोलते, अमित ठाकरे हवालदार झालेत का? गुणरत्न सदावर्तेंचा मनसेवर हल्लाबोल

महाबळेश्वरच्या घाटात 900 फूट दरीत दाम्पत्य कोसळल; पत्नी-पत्नीचा दुर्दैवी अंत, दुसऱ्यादिवशीही चालली शोध मोहिम

आणखी वाचा

Comments are closed.