RCB vs GT : चिन्नास्वामीत पुन्हा दिसणार का किंग कोहलीचा जलवा? पाहा कोणाचं पारडं जड

आयपीएल 2026 मधील 34वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. हा रोमांचक सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार असून, दोन्ही संघांमध्ये जबरदस्त टक्कर अपेक्षित आहे. घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे आरसीबीला थोडेसे वरचढ मानले जात आहे.

आरसीबीकडून कर्णधार रजत पाटीदार संघाचे नेतृत्व करत असले तरी सर्वांचे लक्ष पुन्हा एकदा दिग्गज फलंदाज विराट कोहली याच्यावर असेल. त्याच्यासोबत फिल सॉल्ट ही धडाकेबाज सलामीची जोडी डावाची सुरुवात करेल. मधल्या फळीत रजत पाटीदार महत्त्वाची भूमिका बजावतील, तर शेवटच्या षटकांत टिम डेव्हिड आणि क्रुणाल पांड्या यांच्याकडून मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा असेल.

गुजरात टायटन्ससाठी हा सामना आव्हानात्मक ठरू शकतो, कारण संघ मागील सामन्यात मुंबई इंडियन्सकडून 99 धावांनी पराभूत झाला होता. संघाची फलंदाजी काहीशी अस्थिर दिसत असून, साई सुदर्शन फॉर्ममध्ये नाही. मात्र कर्णधार शुभमन गिल आणि जोस बटलर यांच्यावर मोठी जबाबदारी असेल.

आरसीबीच्या गोलंदाजी विभागात जोश हेजलवुड आणि भुवनेश्वर कुमार यांची अनुभवी जोडी गुजरातच्या फलंदाजांसाठी मोठे आव्हान ठरू शकते. त्यांच्या सोबत सुईश शर्मा आणि क्रुणाल पांड्या फिरकीत महत्त्वाची भूमिका बजावतील.

आरसीबीचा संघ संतुलित दिसत असून, घरच्या मैदानाचा फायदा आणि फॉर्ममध्ये असलेले खेळाडू यामुळे त्यांचा पलडा जड मानला जात आहे. आकडेवारीनुसार आरसीबीच्या विजयाची शक्यता 60 टक्के, तर गुजरात टायटन्सची 40 टक्के मानली जात आहे. मात्र टी-20 क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र बदलू शकते.

आरसीबी संघ : विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जोश हेजलवुड, इतर खेळाडू.

गुजरात टायटन्स संघ : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, शाहरुख खान, राशिद खान, मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा, प्रसिद्ध कृष्णा, राहुल तेवतिया, जेसन होल्डर, आणि इतर खेळाडू.

Comments are closed.