पलटणचं काय होणार? मुंबईने स्वत:च्याच पायावर धोंडा पाडून घेतला; सेहवागनं सांगितलं नेमकं कुठं चुक

मुंबई इंडियन्स प्लेऑफ पात्रता परिस्थिती: मुंबई इंडियन्सची आयपीएल 2026 मधील आतापर्यंतची कामगिरी समाधानकारक नाही. मुंबईने आतापर्यंत 7 सामने खेळले असून त्यापैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत, तर 5 सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा त्यांचा मार्ग आता कठीण झाला आहे. उरलेले सर्व 7 सामने जिंकले तरच त्यांना प्लेऑफमध्ये संधी मिळू शकते, मात्र ते करणे सोपे नाही.

मुंबईने स्वतःचं नुकसान केलं

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांनी क्रिकबजवर बोलताना मुंबईच्या कामगिरीवर टीका केली. त्यांनी सांगितलं की, वानखेडेवर 220 धावांचा पाठलाग करणाऱ्या संघासाठी 207 धावांचं लक्ष्य कठीण नव्हतं. पण मुंबईला ते साधता आलं नाही. “पंजाबकडून चेन्नईकडे गेलेली ‘कुल्हाडी’ आता चेन्नईने मुंबईकडे दिली आणि मुंबईनेच ती स्वतःच्या पायावर मारली,” अशा शब्दांत त्यांनी उपरोधिक टीका केली.

207 धावांच्या दडपणाखाली मुंबईचा डाव 104 धावांत आटोपला

सेहवाग पुढे म्हणाले की, चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजीसमोर मुंबईची सुरुवातच खूपच संथ झाली. पॉवरप्लेमध्ये फक्त 30 धावा करणं म्हणजे प्रति षटक 6 धावा, हे अपेक्षित पातळीपेक्षा खूप कमी आहे. टॉस जिंकूनही मुंबईला फायदा घेता आला नाही. त्यांच्या मते, या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करायला हवी होती.

प्लेऑफचा मार्ग कठीण (Mumbai Indians Playoff Qualification Scenarios)

सेहवाग यांच्या मते, मुंबईला उरलेल्या 7 सामन्यांत उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांत अपयश आलं. संघाला योग्य संयोजन शोधावं लागेल. रोहित शर्मा दुखापतीमुळे बाहेर गेल्यापासून सलामीवीरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच तिलक वर्मा यालाही चांगली सुरुवात करून मोठी खेळी करता आली नाही. सेहवाग म्हणाला की, “मुंबईचा इतिहास चांगला आहे, त्यांनी 5 वेळा किताब जिंकला आहे. पण सध्या ते त्या दर्जाचं क्रिकेट खेळताना दिसत नाहीत. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचणं कठीण वाटतं.”

हे ही वाचा –

Harbhajan Singh Joins BJP : देशांच्या राजकारणात हरभजन सिंगची सर्वात मोठी ‘गुगली’ अन् आपचा गेम ओव्हर! झाडू फेकला बाजूला, आता कमळाची धरली साथ

आणखी वाचा

Comments are closed.