ठाणे महिला व बालविकास निधीतून 73 कोटींचा गैरव्यवहार; प्रकरणाची चौकशी होणार, मंत्री आदिती तटकरें

पुणे : ठाणे जिल्ह्यातील महिला आणि बालविकास विभागांतर्गत जिल्हा नियोजन निधीतून सुमारे ७३ कोटी रुपयांचा कथित गैरव्यवहार  झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिला आहे. मावळ तालुक्यातील किवळे येथील एका नामांकित महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमासाठी त्या आल्या असताना माध्यमांशी त्या बोलत होत्या.(Aditi Tatkare)

महिला आणि बालकांच्या कल्याणासाठी राखीव असलेला निधी गैरमार्गाने वापरला जाणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे. अशा प्रकारचा भ्रष्टाचार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. आम्ही या प्रकरणाची तातडीने दखल घेतली असून, सखोल चौकशीसाठी एक समिती नेमली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या समितीचा अहवाल प्राप्त होताच, या गैरव्यवहारात सामील असलेल्या संबंधितांवर लवकरात लवकर कायदेशीर आणि कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या भूमिकेमुळे आता या प्रकरणातील दोषींचे धाबे दणाणले आहेत. (Aditi Tatkare)

Aditi Tatkare :  नेमकं प्रकरण काय?

ठाण्यातील महिला आणि बालविकास विभागांतर्गत जिल्हा नियोजन निधीतील ७३ कोटींच्या कथित गैरव्यवहाराची बाब समोर आली असून, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. महिला आणि बालकांच्या कल्याणासाठी उपलब्ध असलेला निधी अशा पद्धतीने गैरमार्गाने वापरला जाणे, हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असे सांगतानाच आम्ही याची तातडीने दखल घेतली असून, यावर लवकरात लवकर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिला. जिल्हा नियोजन निधीतील ७३ कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करण्याचे आदेश मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत.

Aditi Tatkare :  वाहिनींना अधिकच्या महत्त्वपूर्ण खात्यांची जबाबदारी दिली तर….

मंत्रीमंडळ खातेबदल अर्थ खाते बदलाबाबत बोलताना आदिती तटकरेंनी म्हटलं की, याबाबत आज मी पहिल्यांदा ऐकते…अजित दादांच्या पश्चात अर्थ संकल्पलीय अधिवेशन लगेच होतं, त्यामुळे अर्थ खातं मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी आमच्या सर्व नेत्यांशी चर्चा करून त्यांच्याकडे ठेवलं….. आता खातेबदलाबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा वाहिनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य ते निर्णय घेतील…. महायुतीमध्ये अर्थ खातं अजित पवारांच्याकडे होते, या खात्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांना होता….आज सुनेत्रा वाहिनी आहेत त्यांच्यावर अधिकच्या महत्त्वपूर्ण खात्यांची जबाबदारी दिली तर आनंद होईल.

Aditi Tatkare :  कुटुंबात जबाबदारीच्या वाटपाबाबत बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या…

राष्ट्रवादी अजित पवार कुटुंबात जबाबदारीच्या वाटपाबाबत बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या, सुनेत्रा वाहिनी यांनी अजित दादाच्या पश्चात पक्षाची जबाबदारी घेतली, पार्थ आणि जय दादा ही पार्टीचे संघटन त्यांच्या पद्धतीने करत आहेत. त्यांनी ज्या जबाबदाऱ्या घेतल्यात मला खात्री आहे की, ते दादांच्या कामाची पद्धत अवलंबून पक्ष अधिक त्याच्या मार्गदर्शनाखाली मजबूत होईल.

Aditi Tatkare :  कार्यकर्ता म्हणून आपल्या नेत्याला सर्वोच पदावर काम करताना…

तर बारामतीच्या निकालाबाबत बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या, आम्हाला खात्री आहे की, सुनेत्रा वाहिनी सर्वाधिक मतांनी निवडून येतील. सुनेत्रा वाहिनी या निवडणुकीला सामोरे गेल्या, पवार साहेबांनी ही त्याच्या पक्षाचा उमेदवार दिला नाही, काँग्रेसने ही नंतर उमेदवार मागे घेतला. अनेकांनी पाठिंबा दिला. त्या सर्वाधिक मतांनी निवडून येतील. एक कार्यकर्ता म्हणून आपल्या नेत्याला सर्वोच पदावर काम करताना पाहण्याची इच्छा असते. मनातील तळमळ असते. ते मी तिथं मांडली. कुठं ना कुठं तरी वाटतं की दादांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न ( मुख्यमंत्री) सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून व्हावं. मी कार्यकर्ता म्हणून भावना मांडल्या याचा विपर्यास करू नये, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.