मुंबईतील ७० वर्षे जुना लिला बंगला २२१ कोटींत विकला, नानावटी कुटुंबाच्या मालकीची होती मालमत्ता

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईतील महागड्या मालमत्तांच्या व्यवहारात आता आणखी एका मोठ्या कराराची भर पडली आहे. जुहू तारा रोडवर असलेला ७० वर्षे जुना आणि सी-फेसिंग असलेला ‘लीला बंगला’ २२१ कोटी रुपयांना विकला गेला आहे. हा बंगला मुंबईतील प्रसिद्ध नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे मालक असलेल्या गौतम नानावटी कुटुंबाच्या मालकीचा होता.

कोणी खरेदी केला हा बंगला?

हा आलिशान बंगला नोटनदास रिअॅलिटीने खरेदी केला आहे. जे नोटनदास ज्वेलर्स ग्रुपचा भाग आहेत. नोटनदास रिअॅलिटीचे संचालक (पिता-पुत्र) महेश नोटनदास जगवानी आणि हर्ष महेश जगवानी यांनी एकत्रितपणे हा व्यवहार पूर्ण केला आहे. महेश जगवानी हे वांद्रे येथील नोटनदास ज्वेलर्सचे संचालक आहेत. या व्यवहारासाठी मोठी स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी फी देखील भरण्यात आली आहे.

काय आहे बंगल्याची खासियत?

हा बंगला आर्ट डेको शैलीत बांधलेला असून त्याला IIB ग्रेडचा हेरिटेज दर्जा प्राप्त आहे. यामुळे नवीन मालकाला बंगल्याच्या मूळ रचनेत जास्त बदल करता येणार नाहीत. दोन मजली असलेल्या या बंगल्याचा प्लॉट एरिया सुमारे १,३५५ चौरस मीटर आहे. यामध्ये ८,४८०.६८ चौरस फुटांचे बिल्ट-अप क्षेत्र, २,५०० चौरस फुटांचा टेरेस आणि ५,००० चौरस फुटांची बाग आहे. या बंगल्याचे दरवाजे बर्मा टीक लाकडावर कोरीव काम करून बनवण्यात आले आहेत.

Comments are closed.