बॉक्स ऑफिसवर ‘गिन्नी वेड्स सनी 2’ची निराशाजनक सुरुवात, अविनाश तिवारी आणि मेधा शंकर यांचा चित्रपट पहिल्याच दिवशी फसला – Tezzbuzz
अविनाश तिवारी आणि मेधा शंकर अभिनीत ‘गिन्नी वेड्स सनी 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तर हा चित्रपट गाजला पण अक्षय कुमार अभिनीत भुत बंगला या चित्रपटाच्या तुलनेत या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील पहिल्या दिवसाची कामगिरी फिकी पडली. गिन्नी वेड्स सनी 2 प्रशांत झा दिग्दर्शित हा चित्रपट आहे. तर हा चित्रपट बॉक्स ऑफिस जास्त चालला नाही. तर दुसरीकडे, ‘भूत बंगला’ने प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यात यश मिळवले आहे. भूत बंगला चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे.
सॅकनिल्कच्या मते,’गिन्नी वेड्स सनी 2′ ने भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 1999 शोमधून केवळ 30 लाख रुपयांची कमाई केली, ज्यात प्रेक्षकांची उपस्थिती केवळ 8% होती. या रोमँटिक कॉमेडी ड्रामा चित्रपटाने रात्रीच्या शोमध्ये सर्वाधिक 9.31% प्रेक्षकसंख्या नोंदवली, त्याखालोखाल संध्याकाळच्या शोमध्ये 8.69%, दुपारच्या शोमध्ये 5.62% आणि सकाळच्या शोमध्ये 3.69% प्रेक्षकसंख्या होती. ‘गिन्नी वेड्स सनी 2’ हा यामी गौतम आणि विक्रांत मेस्सी अभिनीत 2020 च्या ‘गिन्नी वेड्स सनी’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचा सिक्वेल आहे.
'जिनी वेड्स सनी 2' मध्ये अविनाश, मेधा(medha)सुधीर पांडे, लिलेट दुबे आणि गोविंद नामदेव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अविनाश तिवारीचा ‘लैला मजनू’ हा चित्रपट, जो सुरुवातीला प्रदर्शित झाल्यावर फ्लॉप ठरला होता, त्याने 2018 मध्ये प्रदर्शित झाल्यावर पहिल्याच दिवशी 30 लाख रुपये कमावले होते. तर हा गिनी वेड्स सनी 2′ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला आहे.
अरिजित सिंगला ह्या गाण्यामुळे मिळाली खरी ओळख; तर इम्रान हाश्मीच्या रोमांसने केली कमाल
Comments are closed.