सस्पेन्सने भरलेला बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच सिनेमागृहात; तिसऱ्या भागासाठी निर्मात्यांनी केली मोठी गुंतवणूक – Tezzbuzz
‘दृश्यम 3’ हा बहुप्रतीक्षित चित्रपटापैकी एक आहे. तर या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हा चित्रपट प्रदर्शनासाठी आता सज्ज झाला असून 21 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तर या चित्रटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे बजेटही जाहीर केले असून, त्यासाठी आधीच 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. मोहनलाल अभिनीत हा ‘दृश्यम 3’ बहुचर्चित चित्रपट आहे.
तर आता पेन स्टुडिओने इंस्टाग्रामवर मनोरंजन क्षेत्रातील आपल्या पुढील उपक्रमाची घोषणा केली आहे. त्यांनी मोहनलाल अभिनीत ‘दृश्यम 3’ साठी पॅनोरामा स्टुडिओमार्फत आशीर्वाद सिनेमामध्ये 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. या घोषणेत म्हटले आहे, “पेन स्टुडिओ मोहनलाल अभिनीत ‘दृश्यम 3’ साठी पॅनोरामा स्टुडिओमार्फत आशीर्वाद सिनेमामध्ये 100कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. तर या आता पोस्टला अनेकजण प्रतिसाद दिले आहे. आणि अभिनंदन केले आहे. तर या चित्रपट्याच्या चाहत्यासाठी चित्रपटाची डेट रीलीज केल्याने ही एक आंनदाची बातमी ठरली आहे.
'दृश्यम‘ (drishyam) चित्रपटाचा आता पर्यतचा रीजल्ट पाहता तो उत्तमच ठरला आहे. तर दोन्ही भाग सुपरहिट ठरले. तसेच त्यांना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले. इतकेच नाही, तर अनेक दिग्दर्शकांनी ही कथा त्यांच्या प्रादेशिक भाषांमध्ये रूपांतरित केली आहे. बॉलिवूडमध्ये, अजय देवगणचा ‘दृश्यम’ बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता, मोहनलाल अभिनीत ‘दृश्यम 3’ 21 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. तर या चित्रपटाला लोकांचा प्रतिसाद कसा राहिल आणि बॉक्स ऑफिसवर कमाई किती होईल हे पाहण्यासारखे राहील.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
Comments are closed.