कोहलीची 'विराट' कामगिरी, आयपीएलमध्ये 300 षटकारांचा टप्पा पूर्ण..! केवळ 2 खेळाडूंना…..

बंगळुरूच्या ऐतिहासिक एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या आयपीएल 2026च्या 34व्या सामन्यात, विराट कोहलीने एक उल्लेखनीय टप्पा गाठला. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान, आरसीबीचा सलामीवीर फलंदाज विराट कोहलीने 300 षटकार ठोकणारा जगातील तिसरा फलंदाज बनून आयपीएलच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले हा पराक्रम त्याने आपल्या डावातील पहिला षटकार ठोकताच साध्य केला. त्याच्या आधी, या लीगमध्ये 300हून अधिक षटकार ठोकण्याचा विक्रम ख्रिस गेल आणि रोहित शर्मा यांच्या नावावर होता.

आयपीएलच्या इतिहासात 300 षटकार ठोकण्याचा विक्रम सर्वप्रथम ख्रिस गेलने प्रस्थापित केला होता. त्यानंतर, रोहित शर्माने या विशेष यादीत आपले नाव जोडले. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत, किंग कोहलीनेही आता षटकारवीर फलंदाजांच्या या एलिट यादीत आपले स्थान निश्चित केले आहे. 2009 ते 2021 या कालावधीत, ख्रिस गेलने एकूण 142 सामने खेळले, 141 डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने तब्बल 357 षटकार ठोकले. हा विक्रम आजही अबाधित आहे. इतर कोणताही फलंदाज कधीही हा असाधारण पराक्रम गाठू शकेल की नाही, हे सांगणे कठीण आहे. दरम्यान, रोहित शर्माबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 2008 पासून आजपर्यंत एकूण 276 सामने खेळले असून, 271 डावांमध्ये 310 षटकार ठोकले आहेत. आता या प्रतिष्ठित यादीत विराट कोहलीच्या नावाचीही भर पडली आहे. किंग कोहलीने 266 डावांमध्ये 303 षटकार ठोकले आहेत. कालच्या सामन्यात त्याने चार षटकार ठोकले.

आयपीएलच्या इतिहासात 300 हून अधिक षटकार ठोकणारे फलंदाज

ख्रिस गेल – 357
रोहित शर्मा – ३१०
विराट कोहली – ३०३*

डावाच्या आठव्या षटकात जे रशीद खानने टाकले होते विराट कोहलीने एक षटकार ठोकला आणि त्यासह आय़पीएलच्या इतिहासात 300 षटकारांचा विक्रम प्रस्थापित केला. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात, 44 चेंडूंमध्ये 81 धावा काढून तो बाद झाला. जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार ठोकल्यानंतर, चेंडूने कोहलीच्या बॅटची इनसाइड एज घेतली आणि तो बोल्ड झाला. बाद झाल्यानंतर कोहली स्पष्टपणे नाराज दिसून आला. आपल्या या खेळीदरम्यान त्याने 8 चौकार आणि 4 षटकार ठोकले.

Comments are closed.