मेटामध्ये 8 हजार कर्मचाऱ्यांची कपात; 20 मेपासून नोकरीवरून काढणार, 6 हजार रिकामी पदेही भरणार नाही, एआयने केले नोकरीचे वांदे
मेटा प्लॅटफॉर्म्स जवळपास 10 टक्के कर्मचारी कपात करणार आहे. यामुळे कंपनीतील 8 एक हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार हे निश्चित झाले आहे. येत्या 20 मध्ये 2026 पासून हे कर्मचारी कपात सुरू केली जाणार आहे. मेटा कंपनीने AIver pahkas करण्याचे ठरवले असून एआयमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा मेटाकडून करण्यात आली आहे. आयने हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकरीचे वांदे केले आहेत. एआयमुळे मेटा कंपनी 6 एक हजार रिकामी पदेही भरणार नाही. त्यामुळे एकूण 14 एक हजार कर्मचारी कपात होणार आहे.
फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मुख्य कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्सने ही मोठी कर्मचारी कपात करण्याचे ठरवले आहे. कंपनीने हेही स्पष्ट केले की, कंपनीत 6 हजार पदे रिकामी आहेत, परंतु ती आता भरली जाणार नाहीत. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी सध्या आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) प्रॉडक्ट्सला डेव्हलप करण्यासाठी एआय इन्फ्रास्टक्चरमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, या कपातीमध्ये ज्या कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार आहे, त्यांना चांगली नुकसान भरपाई दिली जाईल. अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना 16 आठवडय़ांचा बेसिक पगार, दोन आठवडय़ांचे अतिरिक्त वेतन तसेच 18 महिन्यांसाठी कोब्रा हेल्थ इन्शुरन्स कव्हर दिले जाईल. अन्य देशांमध्येसुद्धा यासारखीच पॅकेज दिली जातील. गेल्या काही महिन्यांपासून टेक कंपन्यांमध्ये मोठी कर्मचारी कपात केली जात आहे. मेटासोबत मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना व्हीआरएस घेण्याचे आवाहन केले आहे. टेक कंपन्यांनी एआयमध्ये गुंतवणूक करण्याचे ठरवल्याने कंपन्या यासारखे निर्णय घेत आहेत.
मेमो आधीच झाला गळती
मेटा कंपनीचे मुख्य कार्मिक अधिकारी जेनेल गेल यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेले पत्र आधीच लीक झाले. या पत्रात त्यांनी म्हटले होते की, कंपनीला अधिक कुशलपणे चालवणारे आणि दुसऱ्या गुंतवणुकीला बॅलन्स करण्यासाठी ही कर्मचारी कपात केली जात आहे. हे पत्र आधीच लीक झाल्याने कंपनीने याची माहिती कर्मचाऱ्यांना दिली. कर्मचाऱ्यांसाठी ही चांगली बातमी नाही. कंपनीच्या या निर्णयामुळे चिंता निर्माण होईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले.
मायक्रोसॉफ्टचा ९ एक हजार कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय
मायक्रोसॉफ्टने अमेरिकेतील एकूण कर्मचारी संख्येच्या जवळपास 7 टक्के म्हणजेच 9 हजार कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. कर्मचाऱ्यांसाठी ही योजना आणली असून यात वरिष्ठ संचालक आणि त्याखालील स्तरांवरील कर्मचाऱ्यांचा विचार केला जाणार आहे. यासाठी कंपनीने 70 चा नियम लागू केला असून कर्मचाऱ्यांचे वय आणि मायक्रोसॉफ्टमधील सेवा काळ यांची एकत्रित बेरीज 70 किंवा त्याहून अधिक असल्यास त्यांनाच स्वेच्छानिवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. एआयच्या वाढत्या प्रभावामुळे कमी मनुष्यबळातही अधिक कार्यक्षमता साध्य करणे शक्य होईल, असे कंपनीचे एचआर एमी कोलमन यांनी म्हटले आहे.
Comments are closed.