Khalnayak Returns: लांब केस, हातात सिगार… 33 वर्षानंतर संजय दत्त पुन्हा दिसला ‘खलनायक’ लूकमध्ये
1993 ला प्रदर्शित झालेला संजय दत्त, माधुरी दिक्षीत, जॅकी श्रॉफ यांची मुख्य भूमिका असलेला खलनायक हा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसचे अनेक रेकॉर्ड मोडले होते. आता 33 वर्षानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे.
शुक्रवारी संजय दत्त व त्याची पत्नी मान्यता दत्त यांनी ‘खलनायक रिटर्न्स’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला. यात संजय दत्त एकदम इंटेन्स लूकमध्ये दिसून येत आहे. हातात सिगार, लांब केस, चेहऱ्यावर जखमा असलेला लूक पाहून पाहणाऱ्याला धडकीच भरेल.
३३ वर्षांनंतर तोच दरारा
१९९३ मध्ये प्रदर्शित झालेला सुभाष घई यांचा ‘खलनायक’ चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यातील ‘बल्लु बलराम’ ही व्यक्तिरेखा आजही लोकांच्या लक्षात आहे. आता इतक्या संजय दत्तच्या चेहऱ्यावरील तोच आक्रमकपणा आणि स्टाईल पाहून चाहत्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
Comments are closed.