IPL 2026 अपराजित पंजाबसमोर दिल्लीची अग्निपरीक्षा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आयपीएलमध्ये कधी कधी सामना हा फक्त दोन संघांमध्ये नसतो, तो आत्मविश्वास आणि दबाव यांच्यात असतो. शनिवारी दुपारी दिल्ली कॅपिटल्ससमोर असाच एक ‘माइंड गेम’ उभा ठाकणार आहे. समोर आहे अजूनही अपराजित असलेला पंजाब किंग्ज. ही दिल्लीसाठी अग्निपरीक्षा असेल.

दिल्लीचा प्रवास सध्या ‘स्टॉप-स्टार्ट’ मोडमध्ये आह. 6 सामन्यांत 3 विजय, 3 पराभव आणि गुणतालिकेत सहावे स्थान. उलट पंजाबने 6 सामन्यांत 11 गुणांसह अव्वल स्थान काबीज केलंय. पावसामुळे एक गुण गेला नसता तर त्यांची मिरवणूक अजून भव्य दिसली असती.

दिल्लीची सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे सुरुवात होते, पण शेवट होत नाही. पथुम निसांका चांगली सुरुवात करूनही मोठी खेळी उभी करू शकत नाही. त्यामुळे मधल्या फळीवर ताण वाढतोय. कर्णधार अक्षर पटेलवर दुहेरी जबाबदारी आहे. फलंदाजी आणि चाणाक्ष नेतृत्व. मागील सामन्यात त्याचे काही निर्णय उलटले, विशेषतः गोलंदाजांच्या वापरात. त्यात क्षेत्ररक्षणातील चुका म्हणजे जखमेवर मीठ चोळल्याचा प्रकार ठरलाय. पण एक चांगली बातमी म्हणजे मिचेल स्टार्क फिट झालाय, पण तो खेळणार का? हा प्रश्न अजून अनुत्तरितच आहे.

दुसरीकडे पंजाब म्हणजे सध्या रन मशीनच. लखनौविरुद्ध केलेला 7 बाद 254 हा धावांचा आकडा नव्हता. तो इशारा आहे. प्रभसिमरन सिंगची स्पह्टक सुरुवात, श्रेयस अय्यरची स्थिरता आणि प्रियांश आर्य-कूपर कोनोलीची आक्रमकता, ही फलंदाजी म्हणजे ‘फुल पॅकेज’फटकेबाजी. गोलंदाजीत अर्शदीप, चहल, यानसेन आणि बार्टलेट सातत्याने विकेट्स काढत प्रतिस्पर्ध्यांचा श्वास रोखताहेत.

दिल्लीला हा सामना जिंकायचा असेल तर ‘परफेक्ट गेम’ खेळावा लागेल. कारण समोरचा पंजाब सध्या फक्त जिंकत नाही तो वर्चस्व गाजवतोय.

Comments are closed.