किरकोळ वादाचा भयानक शेवट, पाठलाग करून मिस्त्रीचा भर रस्त्यात काटा काढला, नांदेड पुन्हा हादरलं!
नांदेड क्राईम न्यूज : नांदेड (Nanded) शहरातील इंदिरा नगर परिसरात एका मिस्त्रीचा भररस्त्यात थरारक शेवट करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रताप गायकवाड असे मृत व्यक्तीचे नाव असून, किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकारामुळे नांदेडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Nanded Crime News: नेमकी घटना काय?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रताप गायकवाड यांचा काही व्यक्तींशी किरकोळ वाद झाला होता. हा वाद मिटला असे वाटत असतानाच, प्रताप घरी जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग सुरू केला. आपल्या मित्रांच्या मदतीने आरोपींनी प्रताप यांना वाटेत अडवले आणि त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात प्रताप गंभीर जखमी झाले आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
Nanded Crime News: पोलिसांची कारवाई
घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तीन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हे कृत्य पूर्ववैमनस्यातून किंवा जुन्या वादातून घडल्याचे बोलले जात आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नांदेड क्राईम न्यूज : पोलिसांसमोर मोठे आव्हान
काही दिवसांपूर्वीच अर्जितसिंग चव्हाण यांच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. ही कारवाई ताजी असतानाच आता पुन्हा एकदा अशा प्रकारचे कृत्य घडल्याने गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नांदेडमध्ये सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.
Ahilyanagar Crime News: राहातामध्येही धक्कादायक घटना
अहिल्यानगरच्या राहाता शहरातील महात्मा फुले नगर परिसरात काल रात्री एक धक्कादायक घटना घडली. नशेच्या अवस्थेत मुलगा सचिन खैरे याने वडील उत्तम खैरे यांच्या डोक्यात फरशी मारून त्यांचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले आहे. कुटुंबातील सततचे वाद, दारूचे व्यसन आणि मारहाणीचा त्रास यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राहाता पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.