संगमनेरच्या भोंदू गडगेला महावितरणचा शॉक! दत्तधाम आश्रमात मीटर बायपास करून चोरली वीज; पोलिसांनंत

अहिल्यानगर क्राईम न्यूज: मंत्र-तंत्र आणि दैवी शक्तीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या संगमनेरच्या वडगावपान येथील भोंदू राजेंद्र गडगे (Rajendra Gadge) याला आता महावितरणने (Mahavitaran) जोरदार ‘शॉक’ दिला आहे. पोलिसांच्या कोठडीत असलेल्या या भोंदूच्या आश्रमावर महावितरणने छापा टाकला असता, तो वीज चोरी करत असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी महावितरणने गडगे याला तब्बल 2 लाखांचा दंड ठोठावला आहे.

अहिल्यानगर क्राईम न्यूज : दत्तधाम आश्रमात मीटर बायपास करून वीजचोरी

राजेंद्र गडगे हा वडगावपान परिसरात ‘दत्तधाम’ नावाने आश्रम चालवत होता. या आश्रमात भक्तांना आकर्षित करण्यासाठी आणि स्वतःच्या आरामासाठी त्याने एअर कंडिशनर्स (AC) आणि पाण्यासाठी बोअरवेल लावली होती. मात्र, याचे वीज बिल वाचवण्यासाठी त्याने चक्क मुख्य मीटर बायपास करून वीज चोरी सुरू केली होती. महावितरणच्या पथकाने जेव्हा आश्रमाची पाहणी केली, तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला.

Ahilyanagar Crime News: भक्तांकडून हजारो रुपयांची लुट

स्वतःला ‘दत्तधाम सरकार’ म्हणवून घेणारा गडगे युट्यूबच्या माध्यमातून कॅन्सरसारखे दुर्धर आजार बरे करण्याचा आणि निसंतान महिलांना अपत्यप्राप्ती करून देण्याचा खोटा दावा करत असे. यासाठी तो 15 हजार ते 51 हजार रुपयांपर्यंतची लूट करत असे. “मंत्रशक्तीने प्रश्न सुटतात” असे सांगणारा हा भोंदू स्वतःच्या आश्रमाचे वीज बिल भरण्यासाठी मात्र चोऱ्या करत असल्याचे सिद्ध झाले आहे.

Ahilyanagar Crime News: भोंदूबाबाच्या पापाचा घडा भरला

दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पाठपुराव्यामुळे संगमनेर पोलिसांनी गडगेसह त्याच्या मुलीवर आणि इतर सहकाऱ्यांवर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असून, आता महावितरणच्या या कारवाईमुळे त्याच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. वीज चोरी प्रकरणी कडक कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया आता महावितरणकडून सुरू करण्यात आली आहे.

Ahilyanagar Crime News: भोंदूबाबाच्या आश्रमाची पोलिसांकडून झाडाझडती

दरम्यान, संगमनेर पोलिसांनी गडगेच्या आश्रमाची चार तास झाडाझडती घेत वडगावपान येथील दत्तधाम दरबारात स्पॉट पंचनामा केला. राजेंद्र गडगे याला दत्तधाम दरबारात नेले असता त्याने पोलिसांसमोर छातीठोकपणे अंनिसला थेट आव्हान करीत मला अडकविण्याचा कट असल्याचे म्हटले. ‘मी लोकांची सेवा करतो, माझ्याकडे दैवी शक्ती आहे. मी मंत्र-तंत्राचा बाप आहे. कारण मी आत्मज्ञानी आहे, अशा शब्दांत भोंदूगिरीचा आरोप असलेला राजेंद्र गडगे याने पोलिसांसमोर छातीठोकपणे आपला म्हणणं मांडलं. विशेष म्हणजे पोलिसांनी बोलण्यास थांबवल्यानंतरही ‘पोलीस माझा छळ करताय’ असे आरोपही त्याने यावेळी केला होता.

आणखी वाचा

Ashok Kharat Crime News: अशोक खरातचा नवा कारनामा उघड,एकाच व्यक्तीच्या नावे 32 बनावट खाती उघडून 57 लाखांची अफरातफर; आणखी एक गुन्हा दाखल

आणखी वाचा

Comments are closed.