उद्धव ठाकरेंसोबतच्या मध्यरात्री भेट घेतल्याच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; चर्चा
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बुधवारी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याचं वृत्त एका मिडीया हाऊसने दिले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसकडून हा दावा करण्यात आला आहे. मात्र या चर्चांना दोन्ही पक्षांनी दुजोरा दिलेला नाही. खासदार संजय राऊत यांनीही यावर भाष्य करण्यास नकार दिला. बैठक झाली का हे दोन नेतेच सांगू शकतील असं राऊत म्हणाले. विधान परिषदेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने भेट झाल्याची चर्चा आहे. या भेटीची चर्चा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाकारत याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Uddhav Thackeray And Devendra Fadnavis Meet: देवेंद्र फडणवीस ठाकरेंच्या भेटीवर नेमकं काय म्हणाले?
नाशिकमध्ये माध्यमांच्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंना जर मला भेटायचं असेल किंवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाही. ती ओपनली देखील केली जाऊ शकते. ते कुठलेच विषय आमच्यात नाहीत की, जे लपवायची आवश्यकता आहे. अशा प्रकारची कुठलीही भेट घडलेली नाही. काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने खोट्या बातम्या देतात त्या खोटारड्या हँडल्सवर नोटीस बजावली जाईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेट: NEMK प्रकरण?
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट ही विधान परिषदेच्या अनुषंगाने भेटल्याचं सांगितलं जात होतं, या भेटीबाबत सध्या चर्चांना उधाण आलं होतं. तर मध्यरात्री झालेल्या या भेटीत फक्त विधान परिषदेची चर्चा झाली की अन्य कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबत तर्क वितर्क लावले जात होते. बुधवारी मध्यरात्री २ वाजता ही भेट झाल्याचा दावा केला जात होता. एका ओळीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसकडून हा दावा करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची कोणतीही भेट झालेली नाही. खोटी बातमी पसरवलेली आहे. अशा पद्धतीची कुठलीही भेट झालेली नाही, अशी माहिती भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिली.
प्रकाश आंबेडकर यांच्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसकडून “मुंबई : उद्धव ठाकरे यांनी काल मध्यरात्री सुमारे २ वाजता मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर भेट दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.”, अशी पोस्ट २३ एप्रिल रोजी शेअर करण्यात आली होती.
आणखी वाचा
Comments are closed.