रिक्षा-टॅक्सीचालक भाषा सक्ती – मराठीचा आग्रह धरणे चुकीचे नाही, पण वाद नको – मुख्यमंत्री

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी भाषेला प्राधान्य देण्याचा आग्रह होत असेल तर त्यात चुकीचे असे काहीच नाही. पण याचबरोबर या विषयावरून वाद होऊ नये, अशी सरकारची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षा-टॅक्सी चालक मराठी भाषा सक्तीच्या मुद्दय़ावर आज मांडली.

ज्या रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा येत नाही त्यांना आम्ही मराठी शिकवू. बळजबरी करून भाषेच्या नावावर हिंसाचार करणे हे योग्य नाही आणि आम्हाला चालणार नाही. यासाठी निश्चितपणे आम्ही त्यांना मराठी शिकवू, कोणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.