गुणतालिकेतील तळाशी असलेल्या संघांची लढाई, LSG vs KKR मध्ये स्पिनचा सापळा, कोण अडकणार, कोण वाचणा
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स लाइव्ह अपडेट मराठीत: आयपीएल 2026 च्या 19व्या हंगामातील 38वा सामना लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि तीन वेळा विजेते कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात रंगणार आहे. हा सामना लखनऊमधील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम येथे खेळवला जाणार असून, फलंदाजांसाठी हा सामना मोठी कसोटी ठरणार आहे.
इकाना स्टेडियमची पिच रिपोर्ट
लखनऊची पिच काळ्या मातीची असल्यामुळे ती पारंपरिकपणे गोलंदाजांना, विशेषतः फिरकीपटूंना मदत करणारी ठरते. ही पिच संथ असते, चेंडू नीट बॅटवर येत नाही आणि उंची कमी मिळते. त्यामुळे फलंदाजांना फटके खेळणे कठीण जाते. सामना जसजसा पुढे जातो, तसतशी पिच अधिक कोरडी आणि खराब होत जाते, ज्यामुळे स्पिनर्सना अधिक टर्न मिळतो. त्यामुळे सुरुवातीच्या षटकांत संयमाने खेळणे अत्यंत महत्त्वाचे असते.
लखनऊचे हवामान
26 एप्रिल रोजी लखनऊमध्ये प्रचंड उकाडा अपेक्षित आहे. दिवसा तापमान सुमारे 42°C तर किमान तापमान 27°C राहण्याची शक्यता आहे. सामना रात्री असल्यामुळे खेळाडूंना काही प्रमाणात दिलासा मिळेल. पावसाची शक्यता नाही. आर्द्रता सुमारे 20% राहील आणि वारा ताशी 6 किमी वेगाने वाहण्याचा अंदाज आहे.
दोन्ही संघांची खराब कामगिरी
या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. लखनऊने 7 सामन्यांत फक्त 2 विजय मिळवत 4 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. केकेआरने 7 पैकी फक्त 1 सामना जिंकत 3 गुणांसह 10व्या स्थानी आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड
एलएसजी आणि केकेआर यांच्यात आतापर्यंत 8 सामने झाले आहेत. त्यात एलएसजीने 5 वेळा विजय मिळवला, तर केकेआरने 2 सामने जिंकले आहेत. एक सामना निष्फळ ठरला आहे.
लखनौ सुपर जायंट्स लीग – (IPL 2026 LSG पूर्ण संघ)
अब्दुल समद, आयुष बडोनी, एडन मार्कराम, मॅथ्यू ब्रेट्झके, हिम्मत सिंग, ऋषभ पंत (कर्ंधर), निकोलस पूरन, मिशेल मार्श, शाहबाज अहमद, अर्शीन कुलकर्णी, मयंक यादव, आवेश खान, मोहसीन खान, मणिमरन सिद्धार्थ, दिग्वेश, मोहम्मद राठी, यज्ञेश राठी, प्रिन्स, यज्ञेश राठी, प्रिन्स शहीद, टी. वानिंदू हसरंगा, एनरिक नॉर्टजे, मुकुल चौधरी, नमन तिवारी, अक्षत रघुवंशी, जोश इंग्लिश.
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ- (IPL 2026 KKR Full Squad)
अजिंक्य रहाणे, अंगकृष्ण रघुवंशी, अनुकुल रॉय, हर्षित राणा, मनीष पांडे, रमणदीप सिंग, रिंकू सिंग, रोवमन पॉवेल, सुनील नरेन, उमरान मलिक, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, कॅमेरॉन ग्रीन, फिन एलन, मथिशा पाथिराना, राहुल सिंग, तेजस्वी सिंह, कार्तिक त्यागी, प्रशांत सोलंकी, राहुल त्रिपाठी, टिम सीफर्ट, ब्लेसिंग मुझारबानी, सार्थक रंजन, दक्ष कामरा, रचिन रवींद्र, आकाश दीप
Comments are closed.